Back to LanguagesPrevious ChapterNext Chapter
Marathi - Chapter 26 - Ash-Shuara
Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink
Verse 1 — Surah Ash-Shuara 26:1
१. ता - सीन - मीम
Verse 2 — Surah Ash-Shuara 26:2
२. या दिव्य ग्रंथाच्या आयती आहेत
Verse 3 — Surah Ash-Shuara 26:3
३. त्यांनी ईमान न राखल्याबद्दल कदाचित तुम्ही आपला जीव सोडाल
Verse 4 — Surah Ash-Shuara 26:4
४. जर आम्ही इच्छिले असते तर त्यांच्यावर आकाशातून एखादी अशी निशाणी अवतरित केली असती की जिच्यासमोर त्यांच्या माना झुकल्या असत्या
Verse 5 — Surah Ash-Shuara 26:5
५. आणि त्यांच्याजवळ रहमान (दयावान अल्लाह) कडून जे देखील नवे बोध- उपदेश आले, त्याकडून तोंड फिरविणारे बनले
Verse 6 — Surah Ash-Shuara 26:6
६. त्या लोकांनी खोटे ठरविले आहे, आता लवकरच त्यांच्याजवळ, त्या गोष्टीची वार्ता येऊन पोहचेल, जिची ते थट्टा उडवित आहेत
Verse 7 — Surah Ash-Shuara 26:7
७. काय त्यांनी जमिनीकडे नाही पाहिले की आम्ही तिच्यात प्रत्येक प्रकारच्या सुंदर जोड्या कितीतरी उगविल्या आहेत
Verse 8 — Surah Ash-Shuara 26:8
८. निःसंशय त्यात मोठी निशाणी आहे, तथापि त्यांच्यापैकी बहुतेक लोक ईमान राखणार नाहीत
Verse 9 — Surah Ash-Shuara 26:9
९. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता वर्चस्वशाली आणि दयावान आहे
Verse 10 — Surah Ash-Shuara 26:10
१०. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने मूसाला पुकारले की तू अत्याचारी जनसमूहाजवळ जा
Verse 11 — Surah Ash-Shuara 26:11
११. फिरऔनच्या जनसमूहाजवळ. काय ते सदाचरण करणार नाहीत
Verse 12 — Surah Ash-Shuara 26:12
१२. मूसा म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मला तर भय वाटते की कदाचित त्यांनी मला खोटे (न) ठरवावे
Verse 13 — Surah Ash-Shuara 26:13
१३. आणि माझी छाती (हृदय) संकुचित होत आहे. माझी जीभ वळत नाही यास्तव तू हारूनकडेही वहयी (प्रकाशना) पाठव
Verse 14 — Surah Ash-Shuara 26:14
१४. आणि त्यांचा माझ्यावर, माझ्या एका चुकीचा (दावा) ही आहे. मला भय वाटते की कदाचित त्यांनी माझी हत्या न करून टाकावी
Verse 15 — Surah Ash-Shuara 26:15
१५. (अल्लाहने) फर्माविले, असे कदापि होणार नाही. थुम्ही दोघे आमच्या निशाण्यांसह जा. आम्ही स्वतः ऐकणारे तुमच्या सोबतीला आहोत
Verse 16 — Surah Ash-Shuara 26:16
१६. तुम्ही दोघे फिरऔनजवळ जाऊन सांगा की निःसंशय आम्ही साऱ्या जगाच्या पालनकर्त्यातर्फे पाठविलेले आहोत
Verse 17 — Surah Ash-Shuara 26:17
१७. की तू आमच्यासोबत इस्राईलच्या संततीला पाठव
Verse 18 — Surah Ash-Shuara 26:18
१८. (फिरऔन) म्हणाला, काय आम्ही तुझे, तुझ्या बालपणात आपल्या येथे पालनपोषण केले नव्हते? आणि तू आपल्या वयाची (आयूष्याची) अनेक वर्षे आमच्यात नाही काढलीत
Verse 19 — Surah Ash-Shuara 26:19
१९. आणि नंतर तू जे आपले काम केले ते केले आणि तू कृतघ्न लोकांपैकी आहेस
Verse 20 — Surah Ash-Shuara 26:20
२०. (मूसा) म्हणाले, मी हे काम अशा वेळी केले जेव्हा मी वाट चुकलेल्या लोकांपैकी होतो
Verse 21 — Surah Ash-Shuara 26:21
२१. नंतर मी तुमच्या दहशतीमुळे तुमच्यापासून पळालो, मग मला माझ्या पालनकर्त्याने आदेश व ज्ञान प्रदान केले आणि मला आपल्या पैगंबरांपैकी केले
Verse 22 — Surah Ash-Shuara 26:22
२२. आणि काय माझ्यावर तुझा हाच तो उपकार आहे? जो तू जाहीर करीत आहेस की तू इस्राईलच्या संततीला गुलाम बनवून ठेवले आहे
Verse 23 — Surah Ash-Shuara 26:23
२३. फिरऔन म्हणाला की सर्व विश्वांचा स्वामी व पालनकर्ता काय आहे
Verse 24 — Surah Ash-Shuara 26:24
२४. (हजरत मूसा) म्हणाले, तो आकाशांचा आणि धरतीचा आणि त्यांच्या दरम्यानच्या समस्त वस्तूंचा स्वामी व पालनकर्ता आहे, जर तुम्ही ईमान राखणारे असाल
Verse 25 — Surah Ash-Shuara 26:25
२५. (फिरऔन) आपल्या निकटच्या लोकांना म्हणाला, काय तुम्ही ऐकत नाही
Verse 26 — Surah Ash-Shuara 26:26
२६. (हजरत मूसा) म्हणाले, तो तुमचा आणि तुमच्या पूर्वजांचाही स्वामी व पालनकर्ता आहे
Verse 27 — Surah Ash-Shuara 26:27
२७. (फिरऔन) म्हणाला, (लोकांनो) तुमचा हा पैगंबर, जो तुमच्याकडे पाठविला गेला आहे, हा तर अगदीच वेडा आहे
Verse 28 — Surah Ash-Shuara 26:28
२८. (हजरत मूसा) म्हणाले, तोच पूर्व आणि पश्चिमेचा आणि त्याच्या दरम्यान असलेल्या समस्त वस्तूंचा पालनकर्ता आहे, जर तुम्ही अक्कल बाळगत असाल
Verse 29 — Surah Ash-Shuara 26:29
२९. (फिरऔन) म्हणाला, खबरदार जर तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला उपास्य बनविले तर मी तुला कैद करून टाकीन
Verse 30 — Surah Ash-Shuara 26:30
३०. (मूसा) म्हणाले, मी तुझ्याजवळ एखादी स्पष्ट वस्तू घेऊन आल्यावरही
Verse 31 — Surah Ash-Shuara 26:31
३१. (फिरऔन) म्हणाला, जर तू सच्चा लोकांपैकी आहेस तर ती सादर कर
Verse 32 — Surah Ash-Shuara 26:32
३२. त्यांनी (त्याच वेळी) आपली काठी खाली टाकली ती अचानक उघड उघड (फार मोठा) अजगर बनली
Verse 33 — Surah Ash-Shuara 26:33
३३. आणि आपला हात बाहेर काढला तर तो देखील त्याच क्षणी पाहणाऱ्यांना शुभ्र प्रकाशमय दिसू लागला
Verse 34 — Surah Ash-Shuara 26:34
३४. (फिरऔन) आपल्या जवळच्या सरदारांना म्हणू लागला की हा तर फार मोठा निष्णात जादूगार आहे
Verse 35 — Surah Ash-Shuara 26:35
३५. हा तर असे इच्छितो की आपल्या जादूच्या जोरावर तुम्हाला तुमच्या भूमीतून बाहेर काढावे. सांगा, आता तुम्ही काय सल्ला देता
Verse 36 — Surah Ash-Shuara 26:36
३६. ते सर्व म्हणाले, तुम्ही याला आणि याच्या भावाला सवड द्या आणि सर्व शहरांमध्ये (लोकांना) एकत्र करणारे पाठवा
Verse 37 — Surah Ash-Shuara 26:37
३७. ज्यांनी तुमच्याजवळ निष्णात जादूगारांना घेऊन यावे
Verse 38 — Surah Ash-Shuara 26:38
३८. मग एका निर्धारित दिवसाच्या वेळी सर्व जादूगार एकत्रित केले गेले
Verse 39 — Surah Ash-Shuara 26:39
३९. आणि सर्वसामान्य लोकांनाही सांगितले गेले की तुम्ही देखील जमा व्हाल
Verse 40 — Surah Ash-Shuara 26:40
४०. यासाठी की जर जादूगार प्रभावी ठरले तर आम्ही त्यांचेच अनुसरण करू
Verse 41 — Surah Ash-Shuara 26:41
४१. जादूगार येऊन फिरऔनला म्हणू लागले की जर आम्ही जिंकलो तर आम्हाला काही बक्षीस वगैरे मिळेल ना
Verse 42 — Surah Ash-Shuara 26:42
४२. (फिरऔन) म्हणाला, होय! (मोठ्या खुशीने) किंबहुना अशा परिस्थितीत तुम्ही माझे खास दरबारी व्हाल
Verse 43 — Surah Ash-Shuara 26:43
४३. (हजरत) मूसा जादूगारांना म्हणाले, जे काय तुम्हाला टाकायचे आहे, ते टाका
Verse 44 — Surah Ash-Shuara 26:44
४४. त्यांनी आपल्या दोऱ्या आणि काठ्या खाली टाकल्या आणि म्हणाले, फिरऔनच्या प्रतिष्ठेची शपथ, आम्ही अवश्य विजयी होऊ
Verse 45 — Surah Ash-Shuara 26:45
४५. आता (हजरत) मूसा यांनीही आपली काठी खाली टाकली, जिने त्याच क्षणी त्यांचा असत्याचा बनविलेला खेळ गिळायला सुरुवात केली
Verse 46 — Surah Ash-Shuara 26:46
४६. हे पाहताच ते जादूगार सजद्यात पडले
Verse 47 — Surah Ash-Shuara 26:47
४७. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही तर सर्व विश्वाच्या पालनकर्त्यावर ईमान राखले
Verse 48 — Surah Ash-Shuara 26:48
४८. अर्थात मूसा आणि हारूनच्या पालनकर्त्यावर
Verse 49 — Surah Ash-Shuara 26:49
४९. (फिरऔन) म्हणाला, माझी परवानगी घेण्यापूर्वीच तुम्ही त्याच्यावर ईमान राखले, निश्चितच हा तुमचा सरदार (मोठा गुरू) आहे, ज्याने तुम्हा सर्वांना जादू शिकवली आहे. तेव्हा तुम्हाला अत्ताच माहीत पडेल. शपथ आहे. मी देखील तुमचे हात पाय विरूद्ध दिशांनी कापून टाकीन आणि तुम्हा सर्वांना फासावर लटकवीन
Verse 50 — Surah Ash-Shuara 26:50
५०. ते म्हणाले, काही हरकत नाही, आम्ही तर आपल्या पालनकर्त्याकडे परतून जाणारच आहोत
Verse 51 — Surah Ash-Shuara 26:51
५१. या कारणास्तव की आम्ही सर्वांत प्रथम ईमान राखणारे बनलो आहोत, आम्ही आशा बाळगतो की आमचा स्वामी व पालनकर्ता आमच्या सर्व चुका माफ करील
Verse 52 — Surah Ash-Shuara 26:52
५२. आणि आम्ही मूसावर वहयी (प्रकाशना) केली की रात्रीच्या रात्री माझ्या दासांना घेऊन निघा. तुम्हा सर्वांचा पाठलाग केला जाईल
Verse 53 — Surah Ash-Shuara 26:53
५३. फिरऔनने शहरांमध्ये जमा करणाऱ्यांना पाठविले
Verse 54 — Surah Ash-Shuara 26:54
५४. की निश्चितच हा समूह अतिशय कमी संख्येत आहे
Verse 55 — Surah Ash-Shuara 26:55
५५. आणि त्यावर हे आम्हाला फार क्रोधित करीत आहेत
Verse 56 — Surah Ash-Shuara 26:56
५६. आणि निःसंशय, आम्ही मोठ्या संख्येत आहोत, त्यांच्यापासून सावध राहणारे
Verse 57 — Surah Ash-Shuara 26:57
५७. शेवटी आम्ही त्यांना बागांमधून व झऱ्यांमधून बाहेर काढले
Verse 58 — Surah Ash-Shuara 26:58
५८. आणि खजिन्यांमधून आणि चांगल्या चांगल्या ठिकाणांमधून
Verse 59 — Surah Ash-Shuara 26:59
५९. अशा प्रकारे झाले, आणि आम्ही त्या (सर्व वस्तूं) चा वारस इस्राईलच्या संततीला बनविले
Verse 60 — Surah Ash-Shuara 26:60
६०. यास्तव फिरऔनचे अनुयायी सूर्य उगवताच त्यांचा पाठलाग करण्यास निघाले
Verse 61 — Surah Ash-Shuara 26:61
६१. यासाठी जेव्हा दोघांनी एकमेकांना पाहिले तेव्हा मूसाचे साथीदार म्हणाले, आम्ही तर खात्रीने पकडीत आलो
Verse 62 — Surah Ash-Shuara 26:62
६२. (हजरत मूसा) म्हणाले, कदापि नाही. विश्वास राखा, माझा रब (पालनकर्ता) माझ्या सोबतीला आहे. जो जरूर मला मार्ग दाखविल
Verse 63 — Surah Ash-Shuara 26:63
६३. आम्ही मूसाकडे वहयी (प्रकाशना) पाठविली की समुद्राच्या पाण्यावर आपल्या काठीचा प्रहार करा तेव्हा त्याच क्षणी समुद्र दुभंगला आणि प्रत्येक हिस्सा पाण्याच्या मोठ्या पर्वताइतका झाला
Verse 64 — Surah Ash-Shuara 26:64
६४. आणि आम्ही त्याच ठिकाणी दुसऱ्यांना जवळ आणून उभे केले
Verse 65 — Surah Ash-Shuara 26:65
६५. आणि मूसा आणि त्यांच्या सर्व साथीदारांना मुक्ती प्रदान केली
Verse 66 — Surah Ash-Shuara 26:66
६६. मग इतर सर्वांना बुडवून टाकले
Verse 67 — Surah Ash-Shuara 26:67
६७. निःसंशय, यात फार मोठा बोध आहे आणि त्यांच्यापैकी अधिकांश लोक ईमान राखणारे नाहीत
Verse 68 — Surah Ash-Shuara 26:68
६८. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा वर्चस्वशाली आणि दया करणारा आहे
Verse 69 — Surah Ash-Shuara 26:69
६९. आणि त्यांना इब्राहीमचा वृत्तांतही ऐकवा
Verse 70 — Surah Ash-Shuara 26:70
७०. जेव्हा त्यांनी आपल्या पित्यास आणि आपल्या जनसमूहाच्या लोकांना फर्माविले की तुम्ही कोणाची उपासना करता
Verse 71 — Surah Ash-Shuara 26:71
७१. त्यांनी उत्तर दिले की आम्ही मूर्तींची उपासना करतो. आम्ही तर सतत त्यांचे उपासक बनून बसलो आहोत
Verse 72 — Surah Ash-Shuara 26:72
७२. पैगंबर (इब्राहीम अलै.) यांनी विचारले, जेव्हा तुम्ही यांना पुकारता तेव्हा काय ते ऐकतातही
Verse 73 — Surah Ash-Shuara 26:73
७३. किंवा तुम्हाला नफा - नुकसानही पोहचवू शकतात
Verse 74 — Surah Ash-Shuara 26:74
७४. ते म्हणाले, हे (सर्व आम्ही नाही जाणत) आम्हाला तर आमचे पूर्वज असेच करताना आढळले आहेत
Verse 75 — Surah Ash-Shuara 26:75
७५. (इब्राहीम) म्हणाले, त्यांना काही जाणता, ज्यांची तुम्ही पूजा करीत आहात
Verse 76 — Surah Ash-Shuara 26:76
७६. तुम्ही आणि तुमच्या पूर्वीचे वाडवडील
Verse 77 — Surah Ash-Shuara 26:77
७७. ते सर्व माझे शत्रू आहेत, त्या सच्चा अल्लाहखेरीज, जो सर्व विश्वाचा पालनकर्ता आहे
Verse 78 — Surah Ash-Shuara 26:78
७८. ज्याने मला निर्माण केले आणि तोच मला मार्गदर्शन करतो
Verse 79 — Surah Ash-Shuara 26:79
७९. तोच आहे जो मला खाऊ-पिऊ घालतो
Verse 80 — Surah Ash-Shuara 26:80
८०. तसेच जेव्हा मी आजारी पडतो तेव्हा तो मला स्वास्थ्य प्रदान करतो
Verse 81 — Surah Ash-Shuara 26:81
८१. आणि तोच मला मृत्यु देईल आणि मग पुन्हा जिवंत करील
Verse 82 — Surah Ash-Shuara 26:82
८२. आणि ज्याच्याकडून आशा बाळगतो की तो मोबदला दिला जाण्याच्या दिवशी माझे अपराध माफ करील
Verse 83 — Surah Ash-Shuara 26:83
८३. हे माझ्या पालनकर्त्या! मला हिकमत (बुद्धी कौशल्य) प्रदान कर आणि मला नेक- सदाचारी लोकांमध्ये सामील कर
Verse 84 — Surah Ash-Shuara 26:84
८४. आणि माझे पवित्र - स्मरण (भविष्यात) येणाऱ्या लोकांमध्येही बाकी ठेव
Verse 85 — Surah Ash-Shuara 26:85
८५. आणि मला सुखांनी भरलेल्या जन्नतच्या वारसांपैकी बनव
Verse 86 — Surah Ash-Shuara 26:86
८६. आणि माझ्या पित्यास क्षमा कर. निःसंशय तो मार्गभ्रष्ट लोकांपैकी होता
Verse 87 — Surah Ash-Shuara 26:87
८७. आणि ज्या दिवशी लोक दुसऱ्यांदा जिवंत केले जातील, मला अपमानित करू नकोस
Verse 88 — Surah Ash-Shuara 26:88
८८. ज्या दिवशी धन-संपत्ती आणि संतती काहीच उपयोगी पडणार नाही
Verse 89 — Surah Ash-Shuara 26:89
८९. परंतु (लाभान्वित तोच ठरेल) जो अल्लाहसमोर व्यंगविरहित हृदय नेईल
Verse 90 — Surah Ash-Shuara 26:90
९०. आणि नेक सदाचारी लोकांकरिता जन्नतला अगदी जवळ आणले जाईल
Verse 91 — Surah Ash-Shuara 26:91
९१. आणि मार्गभ्रष्ट लोकांकरिता जहन्नम उघड केली जाईल
Verse 92 — Surah Ash-Shuara 26:92
९२. आणि त्यांना विचारले जाईल की तुम्ही ज्यांची उपासना करीत राहिले, ते कोठे आहेत
Verse 93 — Surah Ash-Shuara 26:93
९३. जे सर्वश्रेष्ठ अल्लाहखेरीजचे होते. काय हे तुमची मदत करतात किंवा एखादा बदला घेऊ शकतात
Verse 94 — Surah Ash-Shuara 26:94
९४. यास्तव ते सर्व आणि समस्त मार्गभ्रष्ट लोक जहन्नममध्ये वर खाली फेकले जातील
Verse 95 — Surah Ash-Shuara 26:95
९५. आणि इब्लिस (सैताना) चे संपूर्ण सैन्यही
Verse 96 — Surah Ash-Shuara 26:96
९६. तिथे ते आपसात भांडण - तंटा करीत म्हणतील
Verse 97 — Surah Ash-Shuara 26:97
९७. अल्लाहची शपथ! निःसंशय, आम्ही तर उघट अशा चुकींवर होतो
Verse 98 — Surah Ash-Shuara 26:98
९८. वास्तविक तुम्हाला सर्व विश्वाच्या पालनकर्त्यासमान समजत होतो
Verse 99 — Surah Ash-Shuara 26:99
९९. आणि आम्हाला तर गुन्हेगारांखेरीज इतर कोणीही मार्गभ्रष्ट केले नव्हते
Verse 100 — Surah Ash-Shuara 26:100
१००. आता तर आमची कोणी शिफारस करणाराही नाही
Verse 101 — Surah Ash-Shuara 26:101
१०१. आणि ना एखादा (सच्चा) हितचिंतक मित्र
Verse 102 — Surah Ash-Shuara 26:102
१०२. जर आम्हाला एक वेळ दुसऱ्यांदा जाण्याची संधी लाभली असती तर आम्ही पक्के सच्चे ईमानधारक बनलो असतो
Verse 103 — Surah Ash-Shuara 26:103
१०३. निःसंशय, यात एक फार मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक ईमान राखणारे नाहीत
Verse 104 — Surah Ash-Shuara 26:104
१०४. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे
Verse 105 — Surah Ash-Shuara 26:105
१०५. नूहच्या जनसमूहानेही पैगंबरांना खोटे ठरविले
Verse 106 — Surah Ash-Shuara 26:106
१०६. जेव्हा त्यांचा भाऊ नूह यांनी सांगितले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत
Verse 107 — Surah Ash-Shuara 26:107
१०७. (ऐका!) मी तुमच्याकडे अल्लाहचा विश्वस्त रसूल (पैगंबर) आहे
Verse 108 — Surah Ash-Shuara 26:108
१०८. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय बाळगले पाहिजे आणि माझे म्हणणे मान्य केले पाहिजे
Verse 109 — Surah Ash-Shuara 26:109
१०९. आणि मी तुमच्याकडून त्याबद्दल कोणताही मोबदला इच्छित नाही. माझा मोबदला तर केवळ सर्व विश्वांचा पालनकर्त्याजवळ आहे
Verse 110 — Surah Ash-Shuara 26:110
११०. यास्तव तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा
Verse 111 — Surah Ash-Shuara 26:111
१११. (जनसमूहाने) उत्तर दिले की काय आम्ही तुमच्यावर ईमान राखावे? तुमचे आज्ञापालन करणारे तर हलक्या प्रतीचे लोक आहेत
Verse 112 — Surah Ash-Shuara 26:112
११२. (नूह) म्हणाले, मला काय माहीत की पूर्वी ते काय करीत राहिलेत
Verse 113 — Surah Ash-Shuara 26:113
११३. त्यांच्या हिशोबाची जबाबदारी तर माझ्या पालनकर्त्यावर आहे. जर समज बाळगत असाल
Verse 114 — Surah Ash-Shuara 26:114
११४. आणि मी ईमान राखणाऱ्यांना धक्के देणारा (झिडकारणारा) नाही
Verse 115 — Surah Ash-Shuara 26:115
११५. मी तर स्पष्टतः खबरदार करणारा आहे
Verse 116 — Surah Ash-Shuara 26:116
११६. ते म्हणाले, हे नूह! जर तू हे थांबवले नाहीस तर अवश्य तुला दगडांचा मारा करून ठार केले जाईल
Verse 117 — Surah Ash-Shuara 26:117
११७. (नूह) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझ्या जनसमूहाच्या लोकांनी मला खोटे ठरविले
Verse 118 — Surah Ash-Shuara 26:118
११८. तेव्हा तू, माझ्या आणि त्यांच्या दरम्यान निश्चितच फैसला कर, आणि मला व माझ्या ईमानधारक साथीदारांना मुक्ती प्रदान कर
Verse 119 — Surah Ash-Shuara 26:119
११९. यास्तव आम्ही त्याला आणि त्याच्या साथीदारांना भरलेल्या नौकेत (स्वार करून) सुटका प्रदान केली
Verse 120 — Surah Ash-Shuara 26:120
१२०. मग त्यानंतर बाकीच्या सर्व लोकांना आम्ही बुडवून टाकले
Verse 121 — Surah Ash-Shuara 26:121
१२१. निःसंशय, यात मोठा बोध आहे परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक ईमान राखणारे नव्हतेच
Verse 122 — Surah Ash-Shuara 26:122
१२२. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ता मोठा प्रभावशाली, दयावान आहे
Verse 123 — Surah Ash-Shuara 26:123
१२३. आद (जनसमूह) नेही पैगंबरांना खोटे ठरविले
Verse 124 — Surah Ash-Shuara 26:124
१२४. जेव्हा त्यांना त्याचा भाऊ हूदने सांगितले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत
Verse 125 — Surah Ash-Shuara 26:125
१२५. मी तुमचा विश्वस्त पैगंबर (संदेशवाहक) आहे
Verse 126 — Surah Ash-Shuara 26:126
१२६. तेव्हा अल्लाहचे भय राखा आणि माझे म्हणणे मान्य करा
Verse 127 — Surah Ash-Shuara 26:127
१२७. आणि मी त्याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही, माझे पारिश्रमिक (मोबदला) तर सर्व विश्वांच्या पालनकर्त्याजवळ आहे
Verse 128 — Surah Ash-Shuara 26:128
१२८. काय तुम्ही प्रत्येक उंच स्थानावर खेळस्वरूप करमणुकीचे चिन्ह (स्मारक) बनवित आहात
Verse 129 — Surah Ash-Shuara 26:129
१२९. आणि मोठ्या उद्योगाचे (मजबूत महाल निर्माण) करीत आहात, जणू काही तुम्ही सदैवकाळ इथेच राहाल
Verse 130 — Surah Ash-Shuara 26:130
१३०. आणि जेव्हा एखाद्यावर हात टाकता, तेव्हा मोठ्या कठोरपणे पकडता
Verse 131 — Surah Ash-Shuara 26:131
१३१. तेव्हा अल्लाहचे भय राखा आणि माझे म्हणणे मान्य करा
Verse 132 — Surah Ash-Shuara 26:132
१३२. आणि त्याचे भय बाळगा, ज्याने त्या गोष्टीद्वारे तुमची मदत केली, ज्यांना तुम्ही जाणता
Verse 133 — Surah Ash-Shuara 26:133
१३३. त्याने तुमची मदत केली संपत्ती आणि संततीद्वारे
Verse 134 — Surah Ash-Shuara 26:134
१३४. आणि बागा आणि झऱ्यांद्वारे
Verse 135 — Surah Ash-Shuara 26:135
१३५. मला तर तुमच्याबाबत मोठ्या दिवसाच्या शिक्षा- यातनेचे भय वाटते
Verse 136 — Surah Ash-Shuara 26:136
१३६. (ते) म्हणाले की तुम्ही उपदेश करा किंवा उपदेश करणाऱ्यांपैकी राहू नका आमच्याकरिता सारखेच आहे
Verse 137 — Surah Ash-Shuara 26:137
१३७. हा तर प्राचीन काळाच्या लोकांचा दीन (धर्म) आहे
Verse 138 — Surah Ash-Shuara 26:138
१३८. आणि आम्ही कदापि शिक्षा- यातना प्राप्त करणाऱ्यांपैकी असणार नाही
Verse 139 — Surah Ash-Shuara 26:139
१३९. ज्याअर्थी ‘आद’ जनसमूहाच्या लोकांनी (हजरत) हूद यांना खोटे ठरविले यासाठी आम्ही त्यांना नष्ट केले. निःसंशय, यात मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक ईमान राखणारे नव्हते
Verse 140 — Surah Ash-Shuara 26:140
१४०. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे
Verse 141 — Surah Ash-Shuara 26:141
१४१. ‘समूद’ समुदायाच्या लोकांनीही पैगंबरास खोटे ठरविले
Verse 142 — Surah Ash-Shuara 26:142
१४२. जेव्हा त्यांचे बंधु ‘स्वालेह’ने त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय बाळगत नाही
Verse 143 — Surah Ash-Shuara 26:143
१४३. मी तुमच्याकडे अल्लाहचा विश्वस्त पैगंबर आहे
Verse 144 — Surah Ash-Shuara 26:144
१४४. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा
Verse 145 — Surah Ash-Shuara 26:145
१४५. आणि मी त्याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही. माझा मोबदला तर सर्व विश्वांच्या पालनकर्त्याकडे आहे
Verse 146 — Surah Ash-Shuara 26:146
१४६. काय वस्तूं (देणग्यां) मध्ये, ज्या इथे आहेत, तुम्हाला शांतीपूर्वक सोडले जाईल
Verse 147 — Surah Ash-Shuara 26:147
१४७. अर्थात त्या बागांमध्ये आणि त्या झऱ्यांमध्ये
Verse 148 — Surah Ash-Shuara 26:148
१४८. आणि त्या शेतांमध्ये आणि त्या खजुरींच्या बागांमध्ये ज्यांचे घोस (भार वाढल्याने) तुटून पडतात
Verse 149 — Surah Ash-Shuara 26:149
१४९. आणि तुम्ही पर्वतांना कोरून आकर्षक (सुंदर) इमारती निर्माण करता
Verse 150 — Surah Ash-Shuara 26:150
१५०. यास्तव अल्लाहचे भय राखा आणि माझे अनुसरण करा
Verse 151 — Surah Ash-Shuara 26:151
१५१. आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे अनुसरण करण्यापासुन थांबा
Verse 152 — Surah Ash-Shuara 26:152
१५२. जे धरतीत फसाद (उत्पात) पसरवित आहेत आणि सुधारणा करीत नाही
Verse 153 — Surah Ash-Shuara 26:153
१५३. ते म्हणाले, तू तर अशा लोकांपैकी आहेस, ज्यांच्यावर जादूटोणा केला गेला आहे
Verse 154 — Surah Ash-Shuara 26:154
१५४. तू तर आमच्यासारखाच एक मनुष्य आहे. जर तू सच्चा लोकांपैकी आहेस तर एखादा मोजिजा (ईशचमत्कार) घेऊन ये
Verse 155 — Surah Ash-Shuara 26:155
१५५. (स्वालेह) म्हणाले, ही सांडणी आहे. पाणी प्यायची एक पाळी हिची, आणि एका निर्धारित दिवशी पाणी पिण्याची पाळी तुमची
Verse 156 — Surah Ash-Shuara 26:156
१५६. (आणि खबरदार!) हिला वाईट हेतुने हात लावू नका, अन्यथा एका मोठ्या दिवसाची शिक्षा- यातना तुम्हाला येऊन धरेल
Verse 157 — Surah Ash-Shuara 26:157
१५७. तरीही त्यांनी तिचे हात पाय कापून टाकले, नंतर पश्चात्ताप करणारे झाले
Verse 158 — Surah Ash-Shuara 26:158
१५८. तेव्हा अज़ाब (अल्लाहच्या शिक्षा- यातने) ने त्यांना येऊन धरले. निःसंशय, यात मोठी शिकवण (बोध) आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक ईमान राखणारे नव्हते
Verse 159 — Surah Ash-Shuara 26:159
१५९. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा प्रभावशाली, दयावान आहे
Verse 160 — Surah Ash-Shuara 26:160
१६०. लूतच्या जनसमूहानेही पैगंबरांना खोटे ठरविले
Verse 161 — Surah Ash-Shuara 26:161
१६१. जेव्हा त्यांचा भाऊ लूत यांनी त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय नाही बाळगत
Verse 162 — Surah Ash-Shuara 26:162
१६२. मी तुमच्याकडे विश्वस्त रसूल (पैगंबर) आहे
Verse 163 — Surah Ash-Shuara 26:163
१६३. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा
Verse 164 — Surah Ash-Shuara 26:164
१६४. आणि मी तुमच्याकडून याबद्दल कोणताही मोबदला मागत नाही, माझ्या मोबदल्याची जबाबदारी केवळ सर्व विश्वांच्या पालनकर्त्यावर आहे
Verse 165 — Surah Ash-Shuara 26:165
१६५. काय तुम्ही जगातल्या लोकांपैकी पुरुषांजवळ जाता
Verse 166 — Surah Ash-Shuara 26:166
१६६. आणि तुमच्या ज्या स्त्रियांना अल्लाहने तुमची पत्नी बनविले आहे त्यांना सोडून देता, खरी गोष्ट अशी की तुम्ही आहातच मर्यादा ओलांडणारे
Verse 167 — Surah Ash-Shuara 26:167
१६७. (त्यांना) उत्तर दिले की हे लूत! जर तू हे थांबवले नाहीस तर अवश्य तुला बाहेर काढले जाईल
Verse 168 — Surah Ash-Shuara 26:168
१६८. (लूत) म्हणाले, मी तुमच्या आचरणाने अगदी अप्रसन्न आहे
Verse 169 — Surah Ash-Shuara 26:169
१६९. हे माझ्या पालनकर्त्या! मला आणि माझ्या कुटुंबाला या (कुकर्मा) पासून वाचव, जे हे करीत आहेत
Verse 170 — Surah Ash-Shuara 26:170
१७०. यास्तव आम्ही त्यांना आणि त्यांच्याशी संबंध (नाते) असलेल्या सर्वांना वाचविले
Verse 171 — Surah Ash-Shuara 26:171
१७१. एका वृद्ध स्त्रीखेरीज की ती मागे राहणाऱ्यांपैकी झाली
Verse 172 — Surah Ash-Shuara 26:172
१७२. मग आम्ही इतर सर्वांना नष्ट करून टाकले
Verse 173 — Surah Ash-Shuara 26:173
१७३. आणि आम्ही त्यांच्यावर एक खास प्रकारचा पाऊस पाडला. तो मोठा वाईट पाऊस होता, जो खबरदार केल्या गेलेल्या लोकांवर पडला
Verse 174 — Surah Ash-Shuara 26:174
१७४. निःसंशय, यातही मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी अधिकांश लोक ईमान राखणारे नव्हते
Verse 175 — Surah Ash-Shuara 26:175
१७५. निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दया करणारा आहे
Verse 176 — Surah Ash-Shuara 26:176
१७६. एयकावाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले
Verse 177 — Surah Ash-Shuara 26:177
१७७. जेव्हा (पैगंबर) शुऐब त्यांना म्हणाले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत
Verse 178 — Surah Ash-Shuara 26:178
१७८. मी तुमच्याकडे विश्वस्त पैगंबर आहे
Verse 179 — Surah Ash-Shuara 26:179
१७९. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा, आणि माझे आज्ञापालन करा
Verse 180 — Surah Ash-Shuara 26:180
१८०. आणि मी त्याबद्दल तुमच्याकडून कसल्याही मोबदल्याची अपेक्षा करीत नाही. माझ्या मोबदल्याची जबाबदारी तर सर्व विश्वांच्या पालनकर्त्यार आहे
Verse 181 — Surah Ash-Shuara 26:181
१८१. माप - तोल पुरेपूर करा आणि कमी देणाऱ्यांमध्ये सामील होऊ नका
Verse 182 — Surah Ash-Shuara 26:182
१८२. आणि सरळ (उचित) तराजूने तोल करून द्या
Verse 183 — Surah Ash-Shuara 26:183
१८३. आणि लोकांना त्यांच्या वस्तू कमी करून देऊ नका आणि (निर्भय होऊन) धरतीवर उत्पात (फसाद) माजवित फिरू नका
Verse 184 — Surah Ash-Shuara 26:184
१८४. आणि त्या अल्लाहचे भय राखा, ज्याने स्वतः तुम्हाला आणि पूर्वीच्या निर्मितीला निर्माण केले
Verse 185 — Surah Ash-Shuara 26:185
१८५. (ते) म्हणाले, तू तर त्या लोकांपैकी आहेस, ज्यांच्यावर जादूटोणा केला जातो
Verse 186 — Surah Ash-Shuara 26:186
१८६. आणि तू तर आमच्यासारखाच एक मनुष्य आहे आणि आम्ही तर तुला खोटे बोलणाऱ्यांपैकीच समजतो
Verse 187 — Surah Ash-Shuara 26:187
१८७. जर तुम्ही सच्चा लोकांपैकी असाल तर आमच्यावर आकाशाचा एखादा तुकडा कोसळवा
Verse 188 — Surah Ash-Shuara 26:188
१८८. पैगंबर म्हणाले की माझा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणणारा आहे, जे काही तुम्ही करीत आहात
Verse 189 — Surah Ash-Shuara 26:189
१८९. यास्तव त्यांनी त्याला खोटे ठरविले, तेव्हा त्यांना सावलीवाल्या दिवसाच्या अज़ाब (शिक्षा- यातने) ने धरले. तो मोठ्या भयंकर दिवसाचा अज़ाब होता
Verse 190 — Surah Ash-Shuara 26:190
१९०. निःसंशय, त्यात मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक ईमान राखणारे नव्हते
Verse 191 — Surah Ash-Shuara 26:191
१९१. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे
Verse 192 — Surah Ash-Shuara 26:192
१९२. आणि निःसंशय हा (कुरआन) सर्व विश्वांच्या पालनकर्त्याने अवतरित केला आहे
Verse 193 — Surah Ash-Shuara 26:193
१९३. यास विश्वस्त फरिश्ता (जिब्रील) घेऊन आला आहे
Verse 194 — Surah Ash-Shuara 26:194
१९४. तुमच्या हृदयावर (अवतरला आहे) यासाठी की तुम्ही (लोकांना) खबरदार करणाऱ्यांपैकी व्हावे
Verse 195 — Surah Ash-Shuara 26:195
१९५. स्पष्ट अरबी भाषेत आहे
Verse 196 — Surah Ash-Shuara 26:196
१९६. आणि पूर्वी होऊन गेलेल्या पैगंबरांच्या ग्रंथांमध्येही या (कुरआन) ची चर्चा आहे.१
Verse 197 — Surah Ash-Shuara 26:197
१९७. काय त्यांच्यासाठी ही निशाणी पुरेशी नाही की (कुरआनच्या सत्यतेला) इस्राईलच्या संततीचे विद्वानही जाणतात
Verse 198 — Surah Ash-Shuara 26:198
१९८. आणि जर आम्ही याला (अरबी भाषेऐवजी) अन्य एखाद्या भाषेच्या व्यक्तीवर अवतरित केले असते
Verse 199 — Surah Ash-Shuara 26:199
१९९. तर त्याने त्यांच्यासमोर याचे वाचन केले असते, पण यांनी त्यास मानले नसते
Verse 200 — Surah Ash-Shuara 26:200
२००. अशा प्रकारे आम्ही दुराचारी लोकांच्या मनात (इन्कार) दाखल केला आहे
Verse 201 — Surah Ash-Shuara 26:201
२०१. ते जोपर्यंत दुःखदायक शिक्षा- यातना (स्वतः) पाहून घेत नाहीत. तो पर्यंत ईमान राखणार नाहीत
Verse 202 — Surah Ash-Shuara 26:202
२०२. यास्तव तो (अज़ाब) अचानक येऊन पोहोचेल आणि त्यांना त्यांची कल्पना (अनुमान) देखील नसेल
Verse 203 — Surah Ash-Shuara 26:203
२०३. त्या वेळी म्हणतील, काय आम्हाला थोडा अवसर (संधी) दिला जाईल
Verse 204 — Surah Ash-Shuara 26:204
२०४. तर काय हे आमच्या शिक्षा- यातनेकरिता घाई माजवित आहे
Verse 205 — Surah Ash-Shuara 26:205
२०५. बरे, हे सांगा की जर आम्ही त्यांना वर्षानुवर्षे फायदा उचलू दिला
Verse 206 — Surah Ash-Shuara 26:206
२०६. मग त्यांना तो (अज़ाब) येऊन पोहोचला, ज्या विषयी त्यांना भय दाखवले जात होते
Verse 207 — Surah Ash-Shuara 26:207
२०७. तर जे काही फायदे त्यांना पोहोचविले जात राहिले, त्यापैकी काहीही त्यांना उपयोग पडू शकणार नाही
Verse 208 — Surah Ash-Shuara 26:208
२०८. आणि आम्ही कोणत्याही वस्तीला नष्ट केले नाही, परंतु अशाच स्थितीत की तिच्यासाठी खबरदार करणारे होते
Verse 209 — Surah Ash-Shuara 26:209
२०९. बोध (उपदेशा) च्या स्वरूपात आणि आम्ही अत्याचार करणार नाही.१
Verse 210 — Surah Ash-Shuara 26:210
२१०. आणि या (कुरआन) ला सैतान घेऊन आले नाहीत
Verse 211 — Surah Ash-Shuara 26:211
२११. आणि ना ते याच्या योग्य आहेत, ना त्यांना याचे सामर्थ्य आहे
Verse 212 — Surah Ash-Shuara 26:212
२१२. किंबहुना ते तर ऐकण्यापासूनही वंचित केले गेले आहेत
Verse 213 — Surah Ash-Shuara 26:213
२१३. यास्तव तुम्ही अल्लाहच्या सोबत दुसऱ्या एखाद्या आराध्य दैवताला पुकारू नका अन्यथा तुम्हीही शिक्षा प्राप्त करणाऱ्यांपैकी व्हाल
Verse 214 — Surah Ash-Shuara 26:214
२१४. आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना (अल्लाहचे) भय दाखवा
Verse 215 — Surah Ash-Shuara 26:215
२१५. आणि त्यांच्याशी नरमीने वागा, जो कोणी ईमानधारक होऊन तुमच्या अधीन होईल
Verse 216 — Surah Ash-Shuara 26:216
२१६. जर हे लोक तुमची अवज्ञा करतील तर तुम्ही ऐलान करा की तुम्ही जे काही करीत आहात मी त्यापासून अलिप्त आहे
Verse 217 — Surah Ash-Shuara 26:217
२१७. आणि आपला पूर्ण भरोसा त्यावर राखा जो वर्चस्वशाली, दयावान आहे
Verse 218 — Surah Ash-Shuara 26:218
२१८. जो तुम्हाला पाहत असतो, जेव्हा तुम्ही (नमाजसाठी) उभे राहता
Verse 219 — Surah Ash-Shuara 26:219
२१९. आणि सजदा करणाऱ्यांमध्ये तुमचे हिंडणे फिरणेही
Verse 220 — Surah Ash-Shuara 26:220
२२०. निःसंशय तो (अल्लाह) मोठा ऐकणारा आणि मोठा जाणणारा आहे
Verse 221 — Surah Ash-Shuara 26:221
२२१. काय मी तुम्हाला सांगू की सैतान कोणावर उतरतात
Verse 222 — Surah Ash-Shuara 26:222
२२२. ते प्रत्येक खोट्या, दुराचारीवर उतरतात
Verse 223 — Surah Ash-Shuara 26:223
२२३. ते (वरवर) ऐकलेली गोष्ट पोहचवितात आणि त्यांच्यापैकी बहुतेक खोटे आहेत
Verse 224 — Surah Ash-Shuara 26:224
२२४. आणि कवींचे अनुसरण तेच लोक करतात, जे पथभ्रष्ट असावेत
Verse 225 — Surah Ash-Shuara 26:225
२२५. काय तुम्ही नाही पाहिले की कवी दरी - दरीत डोके आपटत फिरतात
Verse 226 — Surah Ash-Shuara 26:226
२२६. आणि ते जे म्हणतात ते करत नाहीत
Verse 227 — Surah Ash-Shuara 26:227
२२७. त्यांच्याखेरीज ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्मे केलीत आणि मोठ्या संख्येने अल्लाहची प्रशंसा (नामःस्मरण) करीत राहिले आणि आपण अत्याचारपीडित असल्यानंतर सूड घेतला, आणि ज्यांनी अत्याचार केला आहे ते देखील लवकरच जाणून घेतील की कोणत्या कुशीवर उलटतात