Back to LanguagesPrevious ChapterNext Chapter
Marathi - Chapter 37 - As-Saffat
Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink
Verse 1 — Surah As-Saffat 37:1
१. शपथ आहे पंक्तिबद्ध होणाऱ्यां (फरिश्त्यां) ची
Verse 2 — Surah As-Saffat 37:2
२. मग पूर्णतः दरडाविणाऱ्यांची
Verse 3 — Surah As-Saffat 37:3
३. मग अल्लाहचा पाठ करणाऱ्यांची
Verse 4 — Surah As-Saffat 37:4
४. निःसंशय, तुम्हा सर्वांचा उपास्य (माबूद) एकच आहे
Verse 5 — Surah As-Saffat 37:5
५. आकाशांच्या आणि धरतीच्या आणि त्यांच्या दरम्यानच्या सर्व वस्तूंचा आणि समस्त पूर्व दिशांचा तोच स्वामी आहे
Verse 6 — Surah As-Saffat 37:6
६. आम्ही जगाच्या (जवळ असलेल्या) आकाशाला तारकांनी सजविले आणि सुशोभित केले आहे
Verse 7 — Surah As-Saffat 37:7
७. आणि (आम्ही त्याचे) प्रत्येक विद्रोही सैतानापासून रक्षण केले आहे
Verse 8 — Surah As-Saffat 37:8
८. उच्च विश्वाच्या फरिश्त्यां (च्या गोष्टी) ऐकण्याकरिता ते कानही लावू शकत नाही, किंबहुना चोहीकडून त्यांच्यावर मारा होत असतो
Verse 9 — Surah As-Saffat 37:9
९. पिटाळून लावण्याकरिता आणि त्यांच्या साठी कायमस्वरूपी अज़ाब (शिक्षा - यातना) आहे
Verse 10 — Surah As-Saffat 37:10
१०. परंतु जो घाईगर्दीने एखादी गोष्टी हिसकावून पळेल तर (तत्क्षणी) एक धगधगता निखारा त्याच्या पाठीशी लागतो
Verse 11 — Surah As-Saffat 37:11
११. या काफिर लोकांना विचारा की त्यांना निर्माण करणे जास्त कठीण आहे की ज्यांना आम्ही निर्माण केले आहे? आम्ही तर मानवांना चिकण मातीपासून निर्माण केले आहे
Verse 12 — Surah As-Saffat 37:12
१२. किंबहुना तुम्ही आश्चर्य व्यक्त करत आहात आणि हे लोक थट्टा उडवित आहेत
Verse 13 — Surah As-Saffat 37:13
१३. आणि जेव्हा त्यांना उपदेश केला जातो तेव्हा ते मानत नाहीत
Verse 14 — Surah As-Saffat 37:14
१४. आणि जेव्हा एखादा ईश-चमत्कार (मोजिजा) पाहतात तेव्हा ते थट्टा उडवितात
Verse 15 — Surah As-Saffat 37:15
१५. आणि म्हणतात की ही तर पूर्णपणे उघड जादू आहे
Verse 16 — Surah As-Saffat 37:16
१६. काय जेव्हा आम्ही मरण पावणार आणि माती व हाडे होऊन जाऊ, मग काय (खरोखर) आम्ही जिवंत केले जाऊ
Verse 17 — Surah As-Saffat 37:17
१७. आणि आमच्यापूर्वी होऊन गेलेले वाडवडीलही
Verse 18 — Surah As-Saffat 37:18
१८. (तुम्ही) उत्तर द्या की होय, आणि तुम्ही अपमानितही व्हाल
Verse 19 — Surah As-Saffat 37:19
१९. ती तर केवळ एक जोरदार दटावणी असेल की ते अचानक पाहू लागतील
Verse 20 — Surah As-Saffat 37:20
२०. आणि म्हणतील की, अरेरे आमचा विनाश, हाच मोबदल्याचा दिवस आहे
Verse 21 — Surah As-Saffat 37:21
२१. हाच तो फैसल्याचा (निर्णयाचा) दिवस, ज्याला तुम्ही खोटे ठरवित राहिलात
Verse 22 — Surah As-Saffat 37:22
२२. अत्याचारींना आणि त्यांच्या साथीदारांना आणि ज्यांची ज्यांची ते (अल्लाहखेरीज) उपासना करीत होते
Verse 23 — Surah As-Saffat 37:23
२३. (त्या सर्वांना) एकत्र करून, त्यांना जहन्नमचा मार्ग दाखवा
Verse 24 — Surah As-Saffat 37:24
२४. आणि त्यांना थांबवून घ्या (यासाठी) की त्यांना आवश्यक प्रश्न विचारले जाणार आहेत
Verse 25 — Surah As-Saffat 37:25
२५. (या वेळी) तुम्ही एकमेकांची मदत करीत नाहीत, याला कारण काय
Verse 26 — Surah As-Saffat 37:26
२६. किंबहुना ते (सर्वजण) आज आज्ञाधारक बनले आहेत
Verse 27 — Surah As-Saffat 37:27
२७. आणि ते एकमेकांना संबोधून प्रश्नोत्तर करू लागतील
Verse 28 — Surah As-Saffat 37:28
२८. म्हणतील की तुम्ही तर आमच्याजवळ आमच्या उजव्या बाजूने येत असत
Verse 29 — Surah As-Saffat 37:29
२९. ते उत्तर देतील की नव्हे, उलट तुम्हीच ईमान राखणारे नव्हते
Verse 30 — Surah As-Saffat 37:30
३०. आणि आमच्या तुमच्यावर काहीच जोर नव्हता, किंबहुना तुम्ही तर (स्वतः) विद्रोही लोक होते
Verse 31 — Surah As-Saffat 37:31
३१. आता आम्हा (सर्वां) वर आमच्या पालनकर्त्याचे हे फर्मान लागू झालेच आहे की आम्ही (शिक्षा-यातनाची) गोडी चाखणार आहोत
Verse 32 — Surah As-Saffat 37:32
३२. तेव्हा आम्ही तुम्हाला पथभ्रष्ट केले, आम्ही तर स्वतःदेखील पथभ्रष्टतेत होतो
Verse 33 — Surah As-Saffat 37:33
३३. तेव्हा आजच्या दिवशी (सर्वच) शिक्षा यातनेचे वाटेकरी आहेत
Verse 34 — Surah As-Saffat 37:34
३४. आम्ही अपराधी लोकांशी असाच (व्यवहार) करतो
Verse 35 — Surah As-Saffat 37:35
३५. हे असे (लोक) आहेत की जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहखेरीज कोणीही उपास्य नाही, तेव्हा हे घमेंड करीत असत
Verse 36 — Surah As-Saffat 37:36
३६. आणि म्हणत की काय आम्ही आपल्या दैवतांना एका वेड्या कवीच्या बोलण्यावरून सोडून द्यावे
Verse 37 — Surah As-Saffat 37:37
३७. (नाही मुळीच नाही) किंबहुना पैगंबर तर सत्य (सच्चा दीन धर्म) घेऊन आले आहेत आणि सर्व पैगंबरांना खरे जाणतात
Verse 38 — Surah As-Saffat 37:38
३८. निःसंशय, तुम्ही दुःखदायक शिक्षा-यातनां (ची गोडी) चाखणार आहात
Verse 39 — Surah As-Saffat 37:39
३९. आणि तुम्हाला त्याचाच मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत होते
Verse 40 — Surah As-Saffat 37:40
४०. तथापि अल्लाहचे सच्चे, प्रामाणिक दास
Verse 41 — Surah As-Saffat 37:41
४१. त्यांच्याचकरिता निर्धारित आजिविका (रोजी) आहे
Verse 42 — Surah As-Saffat 37:42
४२. (प्रत्येक प्रकारचे) मेवे आणि ते सन्मानित आदरणीय असतील
Verse 43 — Surah As-Saffat 37:43
४३. सुखांनी भरलेल्या जन्नतीमध्ये
Verse 44 — Surah As-Saffat 37:44
४४. आसनांवर एकमेकांच्या समोर बसले असतील
Verse 45 — Surah As-Saffat 37:45
४५. प्रवाहित (वाहत्या) मद्याचे प्याले त्यांच्या दरम्यान फिरत असतील
Verse 46 — Surah As-Saffat 37:46
४६. जे स्वच्छ सफेद आणि प्यायला स्वादिष्ट असेल
Verse 47 — Surah As-Saffat 37:47
४७. ना त्याद्वारे डोकेदुखी होईल आणि ना ते प्यायल्याने बहकतील
Verse 48 — Surah As-Saffat 37:48
४८. आणि त्यांच्याजवळ नजर खाली ठेवणाऱ्या आणि मोठमोठे सुंदर नेत्र असणाऱ्या (हूर-पऱ्या) असतील
Verse 49 — Surah As-Saffat 37:49
४९. अशा की जणू लपवून ठेवलेली अंडी
Verse 50 — Surah As-Saffat 37:50
५०. (जन्नतचे लोक) एकमेकांकडे तोंड करून विचारतील
Verse 51 — Surah As-Saffat 37:51
५१. त्यांच्यापैकी एक सांगणारा सांगेल की माझा एक जवळचा (सोबती) होता
Verse 52 — Surah As-Saffat 37:52
५२. जो (मला) सांगत असे की काय तू (कयामतच्या येण्याचा) विश्वास राखणाऱ्यांपैकी आहेस
Verse 53 — Surah As-Saffat 37:53
५३. काय जेव्हा आम्ही मेल्यावर माती आणि हाडे होऊन जाऊ, काय त्या वेळी आम्हाला (कृत कर्मांचा) मोबदला दिला जाईल
Verse 54 — Surah As-Saffat 37:54
५४. सांगितले जाईल, तुम्ही इच्छिता की डोकावून पाहावे
Verse 55 — Surah As-Saffat 37:55
५५. डोकावून पाहताच त्याला जहन्नममध्ये मध्यभागी (जळताना) दिसेल
Verse 56 — Surah As-Saffat 37:56
५६. तो म्हणेल, अल्लाहची शपथ! तू तर माझाही सर्वनाश करण्याच्या जवळ होता
Verse 57 — Surah As-Saffat 37:57
५७. जर माझ्यावर माझ्या पालनकर्त्याची कृपा नसती तर मी देखील जहन्नममध्ये हजर केल्या जाणाऱ्यांपैकी असतो
Verse 58 — Surah As-Saffat 37:58
५८. काय (हे उचित आहे की) आम्ही मरण पावणारच नाहीत
Verse 59 — Surah As-Saffat 37:59
५९. पहिल्या एका मृत्युखेरीज, आणि ना आम्हाला अज़ाब (शिक्षा - यातना) दिला जाईल
Verse 60 — Surah As-Saffat 37:60
६०. मग तर (स्पष्ट आहे की) ही फार मोठी सफलता आहे
Verse 61 — Surah As-Saffat 37:61
६१. अशी (सफलता) प्राप्त करण्यासाठी आचरण करणाऱ्यांनी आचरण केले पाहिजे
Verse 62 — Surah As-Saffat 37:62
६२. काय हे आतिथ्य अधिक चांगले आहे की जक्कूमचे झाड
Verse 63 — Surah As-Saffat 37:63
६३. ज्याला आम्ही अत्याचारी लोकांकरिता कठीण कसोटी बनविले आहे
Verse 64 — Surah As-Saffat 37:64
६४. निःसंशय, ते झाड जहन्नमच्या तळापासून निघते
Verse 65 — Surah As-Saffat 37:65
६५. ज्याचे घोंस (गुच्छे) सैतानाच्या डोक्यांसारखे असतात
Verse 66 — Surah As-Saffat 37:66
६६. जहन्नमवासी याच झाडाला खातील आणि याच्याचद्वारे पोट भरतील
Verse 67 — Surah As-Saffat 37:67
६७. मग त्यावर उकळते पाणी प्यावे लागले
Verse 68 — Surah As-Saffat 37:68
६८. मग त्या सर्वांचे परतणे जहन्नमच्या (आगी) कडेच असेल
Verse 69 — Surah As-Saffat 37:69
६९. विश्वास करा की त्यांना आपले वाडवडील पथभ्रष्ट (असल्याचे) आढळले
Verse 70 — Surah As-Saffat 37:70
७०. आणि हे त्यांच्याच पदचिन्हांवर धावत जात राहिले
Verse 71 — Surah As-Saffat 37:71
७१. आणि त्यांच्यापूर्वी होऊन गेलेले अनेक लोक मार्गभ्रष्ट झाले आहेत
Verse 72 — Surah As-Saffat 37:72
७२. आणि ज्यांच्यात आम्ही खबरदार करणारे रसूल (पैगंबर) पाठविले होते
Verse 73 — Surah As-Saffat 37:73
७३. आता तुम्ही पाहा की ज्यांना (अल्लाहच्या अज़ाबचे) भय दाखविले गेले होते, त्यांचा शेवट कसा झाला
Verse 74 — Surah As-Saffat 37:74
७४. अल्लाहच्या सच्चा प्रामाणिक दासांखेरीज
Verse 75 — Surah As-Saffat 37:75
७५. आम्हाला नूहने पुकारले तर पाहा की आम्ही किती चांगले दुआ (प्रार्थना) कबूल करणारे आहोत
Verse 76 — Surah As-Saffat 37:76
७६. आणि आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या घोर संकटापासून वाचविले
Verse 77 — Surah As-Saffat 37:77
७७. आणि त्याच्या संततीला आम्ही बाकी राहणारी बनविले
Verse 78 — Surah As-Saffat 37:78
७८. आणि आम्ही त्याचे स्मरण (चर्चा) नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवले
Verse 79 — Surah As-Saffat 37:79
७९. नूह (अले.) वर साऱ्या जगात सलाम असो
Verse 80 — Surah As-Saffat 37:80
८०. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो
Verse 81 — Surah As-Saffat 37:81
८१. निःसंशय, तो आमच्या ईमान बाळगणाऱ्या दासांपैकी होता
Verse 82 — Surah As-Saffat 37:82
८२. मग इतर लोकांना आम्ही बुडवून टाकले
Verse 83 — Surah As-Saffat 37:83
८३. आणि त्याच्या (नूहच्या) मागे येणाऱ्यांपैकीच इब्राहीमही होते
Verse 84 — Surah As-Saffat 37:84
८४. जेव्हा ते आपल्या पालनकर्त्याजवळ शुद्ध (निर्दोष) अंतःकरणासह आले
Verse 85 — Surah As-Saffat 37:85
८५. ते आपल्या पित्यास आणि आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले की तुम्ही कशाची भक्ती आराधना करीत आहात
Verse 86 — Surah As-Saffat 37:86
८६. काय तुम्ही अल्लाहखेरीज मनाने रचलेली उपास्ये इच्छिता
Verse 87 — Surah As-Saffat 37:87
८७. तर मग (सांगा की) तुम्ही सर्व विश्वांच्या पालनकर्त्याला काय समजून घेतले आहे
Verse 88 — Surah As-Saffat 37:88
८८. आता (इब्राहीमने) एक नजर ताऱ्यांवर टाकली
Verse 89 — Surah As-Saffat 37:89
८९. आणि म्हणाले की मी तर आजारी आहे
Verse 90 — Surah As-Saffat 37:90
९०. यावर सर्वजण त्याच्यापासून तोंड फिरवित परत चालले गेले
Verse 91 — Surah As-Saffat 37:91
९१. ते (इब्राहीम) हळूच त्यांच्या उपास्यां (देवतां) जवळ गेले आणि म्हणाले, तुम्ही खात का नाहीत
Verse 92 — Surah As-Saffat 37:92
९२. तुम्हाला झालं तरी काय की तुम्ही बोलत सुद्धा नाहीत
Verse 93 — Surah As-Saffat 37:93
९३. मग तर (पूर्ण शक्तीने) उजव्या हाताने त्यांना मारण्यास तुटून पडले
Verse 94 — Surah As-Saffat 37:94
९४. ते (अनेकेश्वरवादी) धावत पळत त्यांच्याकडे आले
Verse 95 — Surah As-Saffat 37:95
९५. तेव्हा ते (इब्राहीम) म्हणाले की तुम्ही अशांची पूजा करता, ज्यांना तुम्ही स्वतः बनविता
Verse 96 — Surah As-Saffat 37:96
९६. वास्तविक तुम्हाला आणि तुम्ही बनविलेल्या वस्तूंना अल्लाहनेच निर्माण केले आहे
Verse 97 — Surah As-Saffat 37:97
९७. ते (लोक) म्हणाले, याच्यासाठी एक घर (अग्निकुंड) तयार करा आणि त्या (धगधगत्या) आगीत याला टाकून द्या
Verse 98 — Surah As-Saffat 37:98
९८. त्यांनी तर त्याच्या (इब्राहीम) शी डाव खेळी इच्छिले, परंतु आम्ही त्यांनाच तोंडघशी पाडले
Verse 99 — Surah As-Saffat 37:99
९९. आणि (इब्राहीम) म्हणाले की मी तर (हिजरत- देशत्याग) करून आपल्या पालनर्त्याकडे जाणार आहे, तो निश्चितच मला मार्ग दाखविल
Verse 100 — Surah As-Saffat 37:100
१००. हे माझ्या पालनकर्त्या! मला नेक सदाचारी पुत्र प्रदान कर
Verse 101 — Surah As-Saffat 37:101
१०१. तेव्हा आम्ही त्याला एक सहनशील पुत्र (प्राप्ती) ची शुभवार्ता दिली
Verse 102 — Surah As-Saffat 37:102
१०२. मग तेव्हा (बालक) या वयास पोहचले की त्याच्यासोबत हिंडू फिरू शकेल, तेव्हा (इब्राहीम) म्हणाले, हे माझ्या प्रिय पुत्रा! मी स्वप्नात स्वतःला तुझे बलिदान (कुर्बानी) करताना पाहत आहे. आता तूच सांग, तुझा काय विचार आहे?१ पुत्राने उत्तर दिले, हे पिता! जो आदेश (अल्लाहतर्फे) दिला जात आहे, त्याचे पालन करा. अल्लाहने इच्छिले तर मी तुम्हाला धीर-संयम राखणाऱ्यांपैकी आढळेल
Verse 103 — Surah As-Saffat 37:103
१०३. अर्थात जेव्हा दोघांनी स्वीकार केला आणि त्या (पित्या) ने त्या (पुत्रा) ला माथा टेकलेल्या अवस्थेत खाली पाडले
Verse 104 — Surah As-Saffat 37:104
१०४. तेव्हा आम्ही हाक मारली, हे इब्राहीम
Verse 105 — Surah As-Saffat 37:105
१०५. निःसंशय, तुम्ही स्वप्नाला खरे करून दाखविले. निःसंशय, आम्ही भलाई करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो
Verse 106 — Surah As-Saffat 37:106
१०६. वास्तविक ही उघड अशी कसोटी होती
Verse 107 — Surah As-Saffat 37:107
१०७. आणि आम्ही एक मोठा जबीहा (बळी), त्याच्या फिदिया (मुक्तीधन) स्वरूपात दिला.२
Verse 108 — Surah As-Saffat 37:108
१०८. आणि आम्ही त्यांची शुभ चर्चा नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवली
Verse 109 — Surah As-Saffat 37:109
१०९. इब्राहीमवर सलाम असो
Verse 110 — Surah As-Saffat 37:110
११०. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो
Verse 111 — Surah As-Saffat 37:111
१११. निश्चितच तो आमच्या ईमान बाळगणाऱ्या दासांपैकी होता
Verse 112 — Surah As-Saffat 37:112
११२. आणि आम्ही त्याला पैगंबर इसहाकचा शुभ समाचार दिला, जो नेक सदाचारी लोकांपैकी असेल
Verse 113 — Surah As-Saffat 37:113
११३. आणि आम्ही इब्राहीम व इसहाकवर अनेक (प्रकारची) समृद्धी अवतरित केली आणि या दोघांच्या संततीत काही तर भाग्यशाली आहेत आणि काही आपल्या प्राणांवर उघड अत्याचार करतात
Verse 114 — Surah As-Saffat 37:114
११४. आणि निश्चितच आम्ही मूसा आणि हारूनवर मोठा उपकार केला
Verse 115 — Surah As-Saffat 37:115
११५. आणि त्यांची आणि त्यांच्या जनसमूहाची फार मोठ्या दुःख-यातनेतून सुटका केली
Verse 116 — Surah As-Saffat 37:116
११६. आणि त्यांची मदत केली, तेव्हा तेच वर्चस्वशाली (विजयी) राहिले
Verse 117 — Surah As-Saffat 37:117
११७. आणि आम्ही त्यांना (स्पष्ट आणि) दिव्य ग्रंथ प्रदान केला
Verse 118 — Surah As-Saffat 37:118
११८. आणि त्या दोघांना सरळ मार्गावर स्थिर (बाकी) ठेवले
Verse 119 — Surah As-Saffat 37:119
११९. आणि आम्ही त्या दोघांकरिता नंतर येणाऱ्यांमध्ये ही गोष्ट बाकी ठेवली
Verse 120 — Surah As-Saffat 37:120
१२०. मूसा आणि हारूनवर सलाम असोे
Verse 121 — Surah As-Saffat 37:121
१२१. निःसंशय, आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करीत असतो
Verse 122 — Surah As-Saffat 37:122
१२२. निःसंशय, हे दोघे आमच्या ईमानधारक दासांपैकी होते
Verse 123 — Surah As-Saffat 37:123
१२३. आणि निःसंशय, इलियास देखील पैगंबरांपैकी होते
Verse 124 — Surah As-Saffat 37:124
१२४. जेव्हा ते आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, तुम्ही अल्लाहचे भय नाही बाळगत
Verse 125 — Surah As-Saffat 37:125
१२५. काय तुम्ही (वअ्ल) नावाच्या मूर्तीला पुकारता आणि सर्वांत उत्तम अशा निर्माणकर्त्याला सोडून देता
Verse 126 — Surah As-Saffat 37:126
१२६. अल्लाह, जो तुमचा आणि तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्व वाडवडिलांचा स्वामी व पालनकर्ता आहे
Verse 127 — Surah As-Saffat 37:127
१२७. परंतु जनसमूहाच्या लोकांनी त्यांना खोटे ठरविले, तेव्हा ते अवश्य (शिक्षा - यातनाग्रस्त अवस्थेत) हजर केले जातील
Verse 128 — Surah As-Saffat 37:128
१२८. मात्र अल्लाहच्या सच्चा प्रामाणिक दासांखेरीज
Verse 129 — Surah As-Saffat 37:129
१२९. आणि आम्ही (इलियासची) शुभा चर्चा नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवली
Verse 130 — Surah As-Saffat 37:130
१३०. इलियासवर सलाम असो
Verse 131 — Surah As-Saffat 37:131
१३१. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो
Verse 132 — Surah As-Saffat 37:132
१३२. निःसंशय, तो आमच्या ईमानधारक दासांपैकी होता.१
Verse 133 — Surah As-Saffat 37:133
१३३. निःसंशय, लूत (अलै.) पैगंबरांपैकी होते
Verse 134 — Surah As-Saffat 37:134
१३४. आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सर्वांना मुक्ती प्रदान केली
Verse 135 — Surah As-Saffat 37:135
१३५. मात्र त्या म्हातारीखेरीज, जी मागे राहणाऱ्यांमध्ये राहिली
Verse 136 — Surah As-Saffat 37:136
१३६. मग आम्ही इतर सर्वांचा सर्वनाश केला
Verse 137 — Surah As-Saffat 37:137
१३७. आणि तुम्ही तर सकाळ झाल्यावर त्यांच्या वस्त्यांवरून जाता
Verse 138 — Surah As-Saffat 37:138
१३८. आणि रात्री देखील, मग काय तरीही समजून घेत नाही
Verse 139 — Surah As-Saffat 37:139
१३९. आणि निःसंशय, यूनुस देखील पैगंबरांपैकी होते
Verse 140 — Surah As-Saffat 37:140
१४०. जेव्हा ते पळून जाऊन भरेलल्या नौकेजवळ पोहोचले
Verse 141 — Surah As-Saffat 37:141
१४१. मग (फासा टाकून) नाव काढले गेले, तेव्हा हे पराभूत झाले
Verse 142 — Surah As-Saffat 37:142
१४२. मग त्यांना माशाने गिळून टाकले आणि ते स्वतःचाच धिःक्कार करू लागले
Verse 143 — Surah As-Saffat 37:143
१४३. तेव्हा जर ते तस्बीह (अल्लाहचे गुणगान) करणाऱ्यांपैकी नसते
Verse 144 — Surah As-Saffat 37:144
१४४. तर लोकांना उठविले जाण्याच्या दिवसापर्यंत माशाच्या पोटातच राहिले असते
Verse 145 — Surah As-Saffat 37:145
१४५. तर आम्ही त्याला सपाट मैदानात टाकून दिले, आणि त्या वेळी तो आजारी होता
Verse 146 — Surah As-Saffat 37:146
१४६. आणि त्याच्यावर सावली करणारे एक वेलीचे झाड उगविले
Verse 147 — Surah As-Saffat 37:147
१४७. आणि आम्ही त्यांना एक लाख, किंबहुना त्याहून जास्त लोकांकडे पाठविले
Verse 148 — Surah As-Saffat 37:148
१४८. तेव्हा त्यांनी ईमान राखले आणि आम्ही एका ठराविक मुदतपर्यंत त्यांना सुख सुविधा प्रदान केली
Verse 149 — Surah As-Saffat 37:149
१४९. त्यांना जरा विचारा की, काय तुमच्या पालनकर्त्याच्या तर मुली (कन्या) आहेत आणि त्यांच्यासाठी पुत्र आहेत
Verse 150 — Surah As-Saffat 37:150
१५०. किंवा हे त्या वेळी हजर होते, जेव्हा आम्ही फरिश्त्यांना स्त्रिया बनवून निर्माण केले
Verse 151 — Surah As-Saffat 37:151
१५१. खबरदार राहा की हे लोक आपल्या मनाने रचलेल्या गोष्टी बोलत आहेत
Verse 152 — Surah As-Saffat 37:152
१५२. की अल्लाहला संतान (मुले बाळे) आहेत, निःसंशय, हे अगदी खोटारडे आहेत
Verse 153 — Surah As-Saffat 37:153
१५३. काय अल्लाहने स्वतःकरिता कन्यांना पुत्रांवर प्राधान्य दिले
Verse 154 — Surah As-Saffat 37:154
१५४. तुम्हाला झाले तरी काय, कसा हुकूम लावत फिरता
Verse 155 — Surah As-Saffat 37:155
१५५. काय तुम्हाला एवढेही समजत नाही
Verse 156 — Surah As-Saffat 37:156
१५६. किंवा तुमच्याजवळ (त्याविषयी) एखादे स्पष्ट प्रमाण आहे
Verse 157 — Surah As-Saffat 37:157
१५७. तर मग जा, सच्चे असाल तर आपलाच ग्रंथ घेऊन या
Verse 158 — Surah As-Saffat 37:158
१५८. आणि त्या लोकांनी तर अल्लाह आणि जिन्नांच्या दरम्यानही नाते कायम केले आहे, आणि वास्तविक जिन्न लोक स्वतः हे ज्ञान बाळगतात की ते (अशी श्रद्धा राखणारे अज़ाबच्या समोर) प्रस्तुत केले जातील
Verse 159 — Surah As-Saffat 37:159
१५९. हे, जे काही (अल्लाहविषयी) सांगत आहेत, त्यापासून सर्वश्रेष्ठ अल्लाह पवित्र (अलिप्त) आहे
Verse 160 — Surah As-Saffat 37:160
१६०. मात्र अल्लाहच्या सच्चा प्रामाणिक दासांखेरीज
Verse 161 — Surah As-Saffat 37:161
१६१. विश्वास करा की तुम्ही सर्व आणि तुमची (खोटी) उपास्ये
Verse 162 — Surah As-Saffat 37:162
१६२. कोणा एकालाही बहकवू शकत नाही
Verse 163 — Surah As-Saffat 37:163
१६३. मात्र त्यांच्याखेरीज, जे जहन्नममध्ये जाणारच आहेत
Verse 164 — Surah As-Saffat 37:164
१६४. (फरिश्त्यांचे कथन आहे) की आमच्यापैकी प्रत्येकाचे स्थान निर्धारित आहे
Verse 165 — Surah As-Saffat 37:165
१६५. आणि आम्ही (अल्लाहच्या आज्ञापालनात) पंक्तिबद्ध (रांगांनी) उभे आहोत
Verse 166 — Surah As-Saffat 37:166
१६६. आणि त्याची तस्बीह (पावित्र्यगान) करीत आहोत
Verse 167 — Surah As-Saffat 37:167
१६७. आणि काफिर तर म्हणत असत
Verse 168 — Surah As-Saffat 37:168
१६८. की जर आमच्याजवळ पूर्वीच्या लोकांची स्मृती असती
Verse 169 — Surah As-Saffat 37:169
१६९. तर आम्ही देखील अल्लाहचे निवडक दास बनलो असतो
Verse 170 — Surah As-Saffat 37:170
१७०. परंतु मग त्यांनी या (कुरआना) चा इन्कार केला, तेव्हा त्यांना लवकरच कळून येईल
Verse 171 — Surah As-Saffat 37:171
१७१. आणि निःसंशय, आमचा वायदा आधीच आपल्या पैगंबरांकरिता लागू झालेला आहे
Verse 172 — Surah As-Saffat 37:172
१७२. की निःसंशय, त्याच लोकांची मदत केली जाईल
Verse 173 — Surah As-Saffat 37:173
१७३. आणि आमचे सैन्य वर्चस्वशाली (आणि श्रेष्ठतम) राहील
Verse 174 — Surah As-Saffat 37:174
१७४. आता तुम्ही काही दिवसा पर्यंत यांच्याकडून तोंड फिरवून घ्या
Verse 175 — Surah As-Saffat 37:175
१७५. आणि त्यांना पाहत राहा, आणि ते देखील लवकरच पाहतील
Verse 176 — Surah As-Saffat 37:176
१७६. काय हे आमच्या (शिक्षा-यातनांकरिता घाई माजवित आहेत)
Verse 177 — Surah As-Saffat 37:177
१७७. (ऐका!) जेव्हा आमचा अज़ाब (शिक्षा यातना) त्यांच्या मैदानांमध्ये येईल, त्या वेळी त्यांची, ज्यांना सावध केले गेले होते, फार वाईट सकाळ असेल
Verse 178 — Surah As-Saffat 37:178
१७८. आणि तुम्ही काही काळापर्यंत त्यांच्याकडून ध्यान हटवा
Verse 179 — Surah As-Saffat 37:179
१७९. आणि पाहात राहा, हे सुद्धा लवकरच पाहतील
Verse 180 — Surah As-Saffat 37:180
१८०. पवित्र आहे तुमचा पालनकर्ता, जो मोठा प्रतिष्ठा बाळगणारा आहे, त्या प्रत्येक गोष्टीहून जी (अनेकेश्वरवादी) बोलत असतात
Verse 181 — Surah As-Saffat 37:181
१८१. आणि पैगंबरांवर सलाम आहे
Verse 182 — Surah As-Saffat 37:182
१८२. आणि समस्त प्रशंसा, सर्व विश्वांच्या पालनकर्त्या अल्लाहकरिता आहे