Back to Languages

Marathi - Chapter 6 - Al-Anam

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 165 — Surah Al-Anam 6:165

१६५. आणि त्यानेच तुम्हाला धरतीत खलीफा बनविले आणि एकमेकांवर दर्जे प्रदान केले, यासाठी की जे काही तुम्हाला प्रदान केले, त्यात तुमची कसोटी घ्यावी. निःसंशय, तुमचा पालनकर्ता लवकरच अज़ाब (शिक्षा-यातना) देणार आहे आणि निःसंशय तो मोठा माफ करणारा आहे, दया करणारा आहे