१. निःसंशय, आम्ही नूह (अलै.) यांना त्यांच्या जनसमूहाकडे पाठविले की आपल्या जनसमूहाला खबरदार करा (आणि सावध करा) यापूर्वी की त्यांच्याजवळ दुःखदायक अज़ाब (शिक्षा - यातना) येऊन पोहचावा
४. तर तो तुमचे अपराध माफ करील, आणि तुम्हाला एका निर्धारित वेळे पर्यर्ंत सवड देईल.१ निःसंशय, अल्लाहचा वायदा (निर्धारित समय) जेव्हा येतो, तेव्हा तो टळत नाही. तुम्हाला हे माहीत असते तर (बरे झाले असते)
७. आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना बोलाविले, यासाठी की तू त्यांना माफ करावे, तेव्हा त्यांनी आपली बोटे आपल्या कानात खुपसलीत आणि आपली वस्त्रे (अंगावर) टाकून घेतली, आणि अडून राहिले व मोठा अहंकार केला
२१. (नूह) म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या! त्या लोकांनी माझी अवज्ञा केली, आणि अशांचे आज्ञापालन केले, ज्यांच्या संपत्ती व संततीने त्यांच्या नुकसानातच भर घातली
२८. हे माझ्या पालनकर्त्या! तू मला आणि माझ्या माता-पित्याला आणि जे देखील ईमान राखून माझ्या घरात येतील आणि समस्त ईमानधारक पुरुषांना आणि समस्त ईमानधारक स्त्रियांना माफ कर आणि काफिरांना विनाशाखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीत वृद्धिंगत करू नकोस