Back to LanguagesPrevious ChapterNext Chapter
Marathi - Chapter 74 - Al-Muddaththir
Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink
Verse 1 — Surah Al-Muddaththir 74:1
१. हे वस्त्र पांघरूण घेणारे
Verse 2 — Surah Al-Muddaththir 74:2
२. उभे राहा आणि खबरदार करा
Verse 3 — Surah Al-Muddaththir 74:3
३. आणि आपल्या पालनकर्त्याचीच महिमा वर्णन करा
Verse 4 — Surah Al-Muddaththir 74:4
४. आणि आपल्या वस्त्रांना पवित्र (स्वच्छ शुद्ध) राखत जा
Verse 5 — Surah Al-Muddaththir 74:5
५. आणि अपवित्रता (मलीनता) सोडून द्या
Verse 6 — Surah Al-Muddaththir 74:6
६. आणि उपकार करून जास्त प्राप्त करून घेण्याची इच्छा धरू नका
Verse 7 — Surah Al-Muddaththir 74:7
७. आणि आपल्या पालनकर्त्याच्या मार्गात धैर्य-संयम राखा
Verse 8 — Surah Al-Muddaththir 74:8
८. तर जेव्हा सूर (शंख) फुंकला जाईल
Verse 9 — Surah Al-Muddaththir 74:9
९. तर तो दिवस अतिशय कठीण दिवस असेल
Verse 10 — Surah Al-Muddaththir 74:10
१०. (जो) काफिरांकरिता सहज - सोपा नसेल
Verse 11 — Surah Al-Muddaththir 74:11
११. मला आणि त्याला सोडून द्या, ज्याला मी एकटा निर्माण केले
Verse 12 — Surah Al-Muddaththir 74:12
१२. आणि त्याला खूप धन देऊन ठेवले आहे
Verse 13 — Surah Al-Muddaththir 74:13
१३. आणि हजर राहणारे पुत्र देखील
Verse 14 — Surah Al-Muddaththir 74:14
१४. आणि मी त्याला पुष्कळशी व्यापकता (संपन्नता) देऊन ठेवली आहे
Verse 15 — Surah Al-Muddaththir 74:15
१५. तरीही तो इच्छा बाळगतो की मी त्याला आणखी जास्त द्यावे
Verse 16 — Surah Al-Muddaththir 74:16
१६. कदापि नाही, तो आमच्या आयतींचा विरोधक आहे
Verse 17 — Surah Al-Muddaththir 74:17
१७. लवकरच मी त्याला कठीण चढ चढविन
Verse 18 — Surah Al-Muddaththir 74:18
१८. त्याने विचार करून एक गोष्ट योजिली
Verse 19 — Surah Al-Muddaththir 74:19
१९. त्याचा नाश होवो! त्याने कशी गोष्ट योजिली
Verse 20 — Surah Al-Muddaththir 74:20
२०. तो पुन्हा नष्ट होवो! त्याने कशी गोष्ट योजिली
Verse 21 — Surah Al-Muddaththir 74:21
२१. मग त्याने पाहिले
Verse 22 — Surah Al-Muddaththir 74:22
२२. मग तोंडावर (कपाळावर) आठ्या घातल्या आणि तोंड वाकडे केले
Verse 23 — Surah Al-Muddaththir 74:23
२३. मग मागे सरकला आणि गर्व केला
Verse 24 — Surah Al-Muddaththir 74:24
२४. आणि म्हणाला, ही तर फक्त जादू आहे, जी साध्य केली जाते
Verse 25 — Surah Al-Muddaththir 74:25
२५. (हे) मानवी कथनाखेरीज आणखी काही नाही
Verse 26 — Surah Al-Muddaththir 74:26
२६. मी लवकरच त्याला जहन्नममध्ये टाकीन
Verse 27 — Surah Al-Muddaththir 74:27
२७. आणि तुम्हाला काय माहीत की जहन्नम काय आहे
Verse 28 — Surah Al-Muddaththir 74:28
२८. ती ना बाकी ठेवते आणि ना सोडते
Verse 29 — Surah Al-Muddaththir 74:29
२९. त्वचेला होरपळून टाकते
Verse 30 — Surah Al-Muddaththir 74:30
३०. आणि तिच्यावर एकोणीस (फरिश्ते तैनात) आहेत
Verse 31 — Surah Al-Muddaththir 74:31
३१. आणि आम्ही जहन्नमचे रक्षक केवळ फरिश्ते ठेवले आहेत आणि आम्ही त्यांची संख्या केवळ काफिरांच्या कसोटीकरिता निर्धारित केली आहे. यासाठी की ग्रंथधारकांनी विश्वास करावा आणि ईमान राखणाऱ्यांच्या ईमानात वृद्धी व्हावी आणि ग्रंथधारक व मुस्लिमांनी संशय करू नये, आणि ज्यांच्या मनात रोग आहे त्यांनी व काफिरांनी म्हणावे की या अशा उदाहरणाने अल्लाहला काय अभिप्रेत आहे? अशा प्रकारे अल्लाह, ज्याला इच्छितो मार्गभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो सन्मार्ग दाखवितो. आणि तुमच्या पालनकर्त्याच्या लष्करांना त्याच्याखेरीज कोणीही जाणत नाही. हा समस्त मानवांकरिता (परिपूर्ण) बोध (आणि भलाई) आहे
Verse 32 — Surah Al-Muddaththir 74:32
३२. कदापि नाही. चंद्राची शपथ
Verse 33 — Surah Al-Muddaththir 74:33
३३. आणि रात्रीची जेव्हा ती पालटते
Verse 34 — Surah Al-Muddaththir 74:34
३४. आणि प्रातःकाळची, जेव्हा तो प्रकाशमान व्हावा
Verse 35 — Surah Al-Muddaththir 74:35
३५. की (निःसंशय ती जहन्नम) मोठ्या गोष्टींपैकी एक आहे
Verse 36 — Surah Al-Muddaththir 74:36
३६. माणसाला भयभीत करणारी
Verse 37 — Surah Al-Muddaththir 74:37
३७. त्या माणसांकरिता, जे तुमच्यापैकी पुढे जाऊ इच्छितील किंवा मागे हटू इच्छितील
Verse 38 — Surah Al-Muddaththir 74:38
३८. प्रत्येक मनुष्य आपल्या कर्मांच्या ऐवजी गहाण आहे
Verse 39 — Surah Al-Muddaththir 74:39
३९. परंतु उजव्या हाताचे
Verse 40 — Surah Al-Muddaththir 74:40
४०. (की) ते जन्नतींमध्ये (बसून) विचारत असतील
Verse 41 — Surah Al-Muddaththir 74:41
४१. अपराधी लोकांना
Verse 42 — Surah Al-Muddaththir 74:42
४२. तुम्हाला जहन्नममध्ये कोणत्या गोष्टीने टाकले
Verse 43 — Surah Al-Muddaththir 74:43
४३. ते उत्तर देतील की आम्ही नमाज पढणारे नव्हतो
Verse 44 — Surah Al-Muddaththir 74:44
४४. भुकेल्यांना जेवु घालत नव्हतो
Verse 45 — Surah Al-Muddaththir 74:45
४५. आणि आम्ही निरर्थक गोष्ट (इन्कार) करणाऱ्यांसोबत निरर्थक गोष्टीत व्यस्त राहात होतो
Verse 46 — Surah Al-Muddaththir 74:46
४६. आणि आम्ही मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरवित होतो
Verse 47 — Surah Al-Muddaththir 74:47
४७. येथेपर्यंत की आमचा मृत्यु आला
Verse 48 — Surah Al-Muddaththir 74:48
४८. तेव्हा त्यांना शिफारस करणाऱ्यांची शिफारस उपयोगी पडणार नाही
Verse 49 — Surah Al-Muddaththir 74:49
४९. त्यांना झाले तरी काय की ते उपदेशापासून तोंड फिरवित आहेत
Verse 50 — Surah Al-Muddaththir 74:50
५०. जणू काही बिचकलेली गाढवे होत
Verse 51 — Surah Al-Muddaththir 74:51
५१. जे सिंहापासून पळत असावे
Verse 52 — Surah Al-Muddaththir 74:52
५२. किंबहुना त्यांच्यापैकी प्रत्येक मनुष्य इच्छितो की त्याला स्पष्ट ग्रंथ दिले जावेत
Verse 53 — Surah Al-Muddaththir 74:53
५३. असे कदापि (होऊ शकत) नाही, किंबहुना हे कयामतबाबत निर्भय आहेत
Verse 54 — Surah Al-Muddaththir 74:54
५४. कदापि नाही! हा (कुरआन) एक उपदेश आहे
Verse 55 — Surah Al-Muddaththir 74:55
५५. आता जो इच्छिल, त्यापासून बोध ग्रहण करील
Verse 56 — Surah Al-Muddaththir 74:56
५६. आणि हे त्याच वेळी बोध ग्रहण करतील, जेव्हा अल्लाह इच्छिल. तो या गोष्टीस पात्र आहे की त्याचे भय राखावे आणि यासही पात्र की त्याने माफ करावे