Back to Languages

Marathi - Chapter 51 - Adh-Dhariyat

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 1 — Surah Adh-Dhariyat 51:1

१. शपथ आहे उडवून विखुरणाऱ्यां (वाऱ्यां) ची

Verse 2 — Surah Adh-Dhariyat 51:2

२. मग ओझे उचलणाऱ्यांची

Verse 3 — Surah Adh-Dhariyat 51:3

३. मग धीम्या गतीने चालणाऱ्यांची

Verse 4 — Surah Adh-Dhariyat 51:4

४. मग कामाची वाटणी करणाऱ्यांची

Verse 5 — Surah Adh-Dhariyat 51:5

५. निःसंशय, तुम्हाला जे वायदे दिले जातात (ते सर्व) खरे आहेत

Verse 6 — Surah Adh-Dhariyat 51:6

६. आणि निश्चितच न्याय होणार आहे

Verse 7 — Surah Adh-Dhariyat 51:7

७. शपथ आहे, मार्ग राखणाऱ्या आकाशाची

Verse 8 — Surah Adh-Dhariyat 51:8

८. निश्चितच तुम्ही विभिन्न गोष्टीत पडला आहात

Verse 9 — Surah Adh-Dhariyat 51:9

९. त्या (सत्या) पासून तोच फिरविला जातो, जो फिरविला गेला असावा

Verse 10 — Surah Adh-Dhariyat 51:10

१०. अटकळीच्या गोष्टी बोलणारे नष्ट केले गेले

Verse 11 — Surah Adh-Dhariyat 51:11

११. जे चेतनाहीन आहेत आणि विसर पडलेले

Verse 12 — Surah Adh-Dhariyat 51:12

१२. विचारतात की मोबदल्याचा दिवस केव्हा येईल

Verse 13 — Surah Adh-Dhariyat 51:13

१३. (होय) हा तो दिवस आहे की हे आगीवर तापविले जातील

Verse 14 — Surah Adh-Dhariyat 51:14

१४. स्वाद चाखा. हेच ते, ज्याची तुम्ही घाई माजवित होते

Verse 15 — Surah Adh-Dhariyat 51:15

१५. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे जन्नतींमध्ये आणि (शीतल) झऱ्यांमध्ये असतील

Verse 16 — Surah Adh-Dhariyat 51:16

१६. त्यांच्या पालनकर्त्याने जे काही त्यांना प्रदान केले आहे, ते घेत असतील ते तर त्यापूर्वीच सत्कर्म करणारे होते

Verse 17 — Surah Adh-Dhariyat 51:17

१७. ते रात्री फार कमी झोपत असत

Verse 18 — Surah Adh-Dhariyat 51:18

१८. आणि ते रात्रीच्या अंतिम प्रहरी (पहाटे) क्षमा - याचना करीत

Verse 19 — Surah Adh-Dhariyat 51:19

१९. आणि त्यांच्या धन-संपत्तीत याचकांचा(मागणाऱ्यांचा)आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचा हक्क होता

Verse 20 — Surah Adh-Dhariyat 51:20

२०. आणि विश्वास राखणाऱ्यांकरिता तर धरतीत अनेक निशाण्या आहेत

Verse 21 — Surah Adh-Dhariyat 51:21

२१. आणि स्वतः तुमच्या अस्तित्वात देखील, तर काय तुम्ही पाहत नाहीत

Verse 22 — Surah Adh-Dhariyat 51:22

२२. आणि तुमची आजिविका(अन्न सामुग्री) आणि जो तुम्हाला वायदा दिला जात आहे, सर्व आकाशात आहे

Verse 23 — Surah Adh-Dhariyat 51:23

२३. तेव्हा आकाश आणि धरतीच्या स्वामी व पालनकर्त्याची शपथ! हे अगदी सत्य आहे, असेच खात्रीपूर्वक, जसे तुम्ही बोलता

Verse 24 — Surah Adh-Dhariyat 51:24

२४. काय तुम्हाला इब्राहीम (अलैहिस्सलाम) च्या सन्मानित अतिथींची वार्ताही पोहचली आहे

Verse 25 — Surah Adh-Dhariyat 51:25

२५. ते जेव्हा त्यांच्याजवळ आले तेव्हा सलाम केला. (इब्राहीम) यांनी सलामला उत्तर दिले (आणि म्हणाले, हे तर) अनोळखी लोक आहेत

Verse 26 — Surah Adh-Dhariyat 51:26

२६. मग (गुपचुप घाईघाईने) आपल्या कुटुंबियांकडे गेले आणि एका लठ्ठ वासरुचे (मांस) घेऊन आले

Verse 27 — Surah Adh-Dhariyat 51:27

२७. आणि ते त्यांच्या पुढे ठेवले आणि म्हणाले, तुम्ही खात का नाही

Verse 28 — Surah Adh-Dhariyat 51:28

२८. मग मनातल्या मनात त्यांच्यापासून भयभित झाले. (अतिथी) म्हणाले, तुम्ही भिऊ नका आणि त्यांना (हजरत) इब्राहीमला एका ज्ञानी पुत्रप्राप्तीची शुभवार्ता दिली

Verse 29 — Surah Adh-Dhariyat 51:29

२९. तेव्हा त्यांच्या पत्नीने आश्चर्यचकित होऊन आपल्या तोंडावर हात मारून म्हटले की मी तर म्हातारी आहे, त्याचबरोबर वांझ देखील

Verse 30 — Surah Adh-Dhariyat 51:30

३०. ते म्हणाले की होय, तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने असेच फर्माविले आहे. निःसंशय, तो हिकमशाली आणि जाणणारा आहे

Verse 31 — Surah Adh-Dhariyat 51:31

३१. (हजरत इब्राहीम अलै.) म्हणाले की अल्लाहने पाठविलेल्या (फरिश्त्यां) नो! तुमच्या (येण्याचा) हेतू काय

Verse 32 — Surah Adh-Dhariyat 51:32

३२. त्यांनी उत्तर दिले की आम्ही अपराधी लोकांकडे पाठविले गेलो आहोत

Verse 33 — Surah Adh-Dhariyat 51:33

३३. यासाठी की आम्ही त्याच्यावर (भाजलेल्या) मातीच्या दगडांचा वर्षाव करावा

Verse 34 — Surah Adh-Dhariyat 51:34

३४. जे तुमच्या पालनकर्त्यातर्फे चिन्हांकित झाले आहेत त्या मर्यादा भंग करणाऱ्यांकरिता

Verse 35 — Surah Adh-Dhariyat 51:35

३५. तेव्हा जेवढे ईमान राखणारे तिथे होते, आम्ही त्यांना तेथून काढले

Verse 36 — Surah Adh-Dhariyat 51:36

३६. आणि आम्हाला तिथे मुसलमानांचे फक्त एकच घर आढळले

Verse 37 — Surah Adh-Dhariyat 51:37

३७. आणि आम्ही तिथे त्यांच्यासाठी, जे दुःखदायक शिक्षा यातनेचे भय बाळगतात, एक पूर्ण चिन्ह सोडले

Verse 38 — Surah Adh-Dhariyat 51:38

३८. आणि मूसाच्या वृत्तांतात (ही आमच्यातर्फे तंबी आहे) जेव्हा आम्ही त्यांना फिरऔनकडे स्पष्ट प्रमाणासह पाठविले

Verse 39 — Surah Adh-Dhariyat 51:39

३९. तेव्हा त्याने आपल्या सामर्थ्याच्या घमेंडीत तोंड फिरविले, आणि म्हणाले, हा (एकतर) जादूगार आहे किंवा वेडसर आहे

Verse 40 — Surah Adh-Dhariyat 51:40

४०. शेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या सैन्याला आपल्या शिक्षा-यातनेत धरून, समुद्रात टाकले. तो होताच निर्भर्त्सना करण्यायोग्य

Verse 41 — Surah Adh-Dhariyat 51:41

४१. त्याचप्रमाणे आदच्या लोकांमध्येही (आमच्यातर्फे तंबी आहे) जेव्हा आम्ही त्यांच्यावर वांझ (अशुभ) वादळ पाठविले

Verse 42 — Surah Adh-Dhariyat 51:42

४२. ते ज्या ज्या वस्तूवरून गेले, तिला जीर्ण हाडांप्रमाणे चूरेचूर करून टाकले

Verse 43 — Surah Adh-Dhariyat 51:43

४३. आणि समूद (च्या वृत्तांता) मध्येही (बोध) आहे, जेव्हा त्यांना सांगितले गेले की तुम्ही काही दिवसापर्यंत लाभ प्राप्त करून घ्या

Verse 44 — Surah Adh-Dhariyat 51:44

४४. परंतु त्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाचे पालन केले नाही, ज्याबद्दल त्यांना एका भयंकर गर्जनेने नष्ट करून टाकले आणि ते बघतच राहिले

Verse 45 — Surah Adh-Dhariyat 51:45

४५. मग ना तर ते उभे राहू शकले, आणि ना सूड घेऊ शकले

Verse 46 — Surah Adh-Dhariyat 51:46

४६. आणि नूह (अलै.) यांच्या जनसमूहाची देखील याच्या आधी (हीच अवस्था झाली होती) ते देखील मोठे अवज्ञाकारी लोक होते

Verse 47 — Surah Adh-Dhariyat 51:47

४७. आणि आकाशाला आम्ही (आपल्या) हातांनी बनविले आहे आणि निःसंशय, आम्ही व्यापक करणारे आहोत

Verse 48 — Surah Adh-Dhariyat 51:48

४८. आणि जमिनीला आम्ही बिछाईत बनविले आहे, तेव्हा आम्ही किती चांगले बिछाईत करणारे आहोत

Verse 49 — Surah Adh-Dhariyat 51:49

४९. आणि प्रत्येक वस्तूला आम्ही जोडी जोडीने निर्माण केले आहे,१ यासाठी की तुम्ही बोध ग्रहण करावा

Verse 50 — Surah Adh-Dhariyat 51:50

५०. तेव्हा तुम्ही अल्लाहकडे धाव घ्या. निःसंशय, मी तुम्हाला त्याच्यातर्फे खबरदार करणारा आहे

Verse 51 — Surah Adh-Dhariyat 51:51

५१. आणि अल्लाहसोबत दुसऱ्या कोणालाही उपास्य (दैवत) बनवू नका, निश्चितच, मी तुम्हाला त्याच्यातर्फे स्पष्टतः सावध करणारा आहे

Verse 52 — Surah Adh-Dhariyat 51:52

५२. अशाच प्रकारे जे लोक त्यांच्या पूर्वी होऊन गेलेत, त्यांच्याजवळ जो देखील पैगंबर आला, त्याला ते म्हणाले की एकतर हा जादूगार आहे किंवा वेडा

Verse 53 — Surah Adh-Dhariyat 51:53

५३. काय हे, या गोष्टीची एकमेकांना ताकीद करत गेलेत, नव्हे, किंबहुना हे सर्व विद्रोही (उन्मत्त) लोक आहेत

Verse 54 — Surah Adh-Dhariyat 51:54

५४. तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून तोंड फिरवून घ्या, तुमच्यावर कसलाही दोषारोप नाही

Verse 55 — Surah Adh-Dhariyat 51:55

५५. आणि उपदेश करीत राहा, निःसंशय हा उपदेश ईमान राखणाऱ्यांना लाभ देईल

Verse 56 — Surah Adh-Dhariyat 51:56

५६. मी जिन्नांना आणि मानवांना फक्त अशासाठी निर्माण केले आहे की त्यांनी केवळ माझी उपासना करावी.१

Verse 57 — Surah Adh-Dhariyat 51:57

५७. त्यांच्याकडून मी ना आजिविका (रोजी) इच्छितो ना असे इच्छितो की त्यांनी मला खाऊ घालावे

Verse 58 — Surah Adh-Dhariyat 51:58

५८. निःसंशय, अल्लाह स्वतः रोजी देणारा सामर्थ्यशाली व बलवान आहे

Verse 59 — Surah Adh-Dhariyat 51:59

५९. तेव्हा ज्या लोकांनी अत्याचार केला आहे, त्यांनाही त्यांच्या साथीदारांच्या हिश्श्याइतकाच हिस्सा मिळेल, यास्तव त्यांनी माझ्याशी घाईने मागू नये

Verse 60 — Surah Adh-Dhariyat 51:60

६०. तेव्हा दुर्दशा आहे काफिरांसाठी, त्यांच्या त्या दिवशी ज्याचा त्यांना वायदा दिला जात आहे