Back to LanguagesPrevious ChapterNext Chapter
Marathi - Chapter 53 - An-Najm
Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink
Verse 1 — Surah An-Najm 53:1
१. ताऱ्याची शपथ आहे, जेव्हा तो कोसळेल
Verse 2 — Surah An-Najm 53:2
२. की तुमचा साथीदार ना वाट चुकलेला आहे, ना तो वाकड्या मार्गावर आहे
Verse 3 — Surah An-Najm 53:3
३. आणि ना आपल्या मर्जीने तो काही बोलतो
Verse 4 — Surah An-Najm 53:4
४. ती तर केवळ वहयी (आकाशवाणी) आहे, जी अवतरित केली जाते
Verse 5 — Surah An-Najm 53:5
५. त्याला पूर्ण सामर्थ्यशाली फरिश्त्याने शिकविले आहे
Verse 6 — Surah An-Najm 53:6
६. जो मोठा शक्तिशाली आहे, मग तो सरळ उभा राहिला
Verse 7 — Surah An-Najm 53:7
७. आणि तो अति उच्च आकाशाच्या किनाऱ्या (क्षितिजा) वर होता
Verse 8 — Surah An-Najm 53:8
८. मग जवळ आला आणि अवतरला
Verse 9 — Surah An-Najm 53:9
९. तेव्हा तो दोन कमानीइतक्या अंतरावर राहिला, किंबहुना त्याहून कमी
Verse 10 — Surah An-Najm 53:10
१०. मग त्याने अल्लाहच्या दासाला संदेश पोहचविला, जो काही पोहचविला
Verse 11 — Surah An-Najm 53:11
११. हृदयाने खोटे म्हटले नाही, जे (पैगंबरा) ने पाहिले
Verse 12 — Surah An-Najm 53:12
१२. काय तुम्ही त्या गोष्टीबद्दल वाद घालता, जे पैगंबर पाहतात
Verse 13 — Surah An-Najm 53:13
१३. त्याला तर आणखी एका वेळी पाहिले होते
Verse 14 — Surah An-Najm 53:14
१४. ‘सिदरतुल मुन्तहा’च्या जवळ
Verse 15 — Surah An-Najm 53:15
१५. त्याच्याच निकट ‘जन्नतुल मावा’ आहे
Verse 16 — Surah An-Najm 53:16
१६. जेव्हा सिदरला लपवून घेत होती, ती वस्तू, जी त्यावर आच्छादित होत होती
Verse 17 — Surah An-Najm 53:17
१७. ना तर दृष्टी वळली, ना मर्यादेच्या पुढे गेली
Verse 18 — Surah An-Najm 53:18
१८. निश्चितच त्याने आपल्या पालनकर्त्याच्या मोठमोठ्या निशाण्यांपैकी काही निशाण्या पाहिल्या होत्या
Verse 19 — Surah An-Najm 53:19
१९. काय तुम्ही ‘लात’ आणि ‘उज्जा’ला पाहिले
Verse 20 — Surah An-Najm 53:20
२०. आणि तिसऱ्या अंतिम ‘मनात’ला?१
Verse 21 — Surah An-Najm 53:21
२१. काय तुमच्यासाठी पुत्र आणि त्या (अल्लाह) साठी कन्या आहेत
Verse 22 — Surah An-Najm 53:22
२२. ही तर मोठी अन्यायपूर्ण वाटणी आहे
Verse 23 — Surah An-Najm 53:23
२३. वास्तविक ती केवळ नावे आहेत, जी तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी त्यांना ठेवली आहेत. अल्लाहने त्यांची कोणतीही सनद अवतरित केली नाही. हे लोक तर केवळ अटकळ (भ्रम) आणि आपल्या मनाच्या इच्छा आकांक्षांमागे लागले आहेत. आणि निःसंशय, त्यांच्या पालनकर्त्यातर्फे त्यांच्याजवळ मार्गदर्शन येऊन पोहोचले आहे
Verse 24 — Surah An-Najm 53:24
२४. काय प्रत्येक मनुष्य जी कामना देखील करील ती त्याला साध्य होईल
Verse 25 — Surah An-Najm 53:25
२५. अल्लाहकरिताच आहे हे विश्व आणि ती आखिरत
Verse 26 — Surah An-Najm 53:26
२६. आणखी कितीतरी फरिश्ते आकाशांमध्ये आहेत, ज्यांची शिफारस काहीच उपयोगी पडू शकत नाही, मात्र ही गोष्ट वेगळी की अल्लाह आपल्या इच्छेने व आपल्या खुशीने ज्याला इच्छिल आज्ञा (अनुमती) देईल.१
Verse 27 — Surah An-Najm 53:27
२७. निःसंशय, जे लोक आखिरतवर ईमान राखत नाही, ते फरिश्त्यांना स्त्रीरूपी देवतांची नावे देतात
Verse 28 — Surah An-Najm 53:28
२८. वास्तविक त्यांना याचे काहीच ज्ञान नाही. ते केवळ आपल्या भ्रमाच्या मागे लागले आहेत आणि निःसंशय, भ्रम (आणि अनुमान) सत्यासमोर काहीच उपयोगी पडत नाही
Verse 29 — Surah An-Najm 53:29
२९. तेव्हा तुम्ही त्याच्याकडून तोंड फिरवून घ्या, जो आमच्या स्मरणांपासून तोंड फिरविल आणि ज्यांचा उद्देश केवळ ऐहिक जीवनाखेरीज काही नसावा
Verse 30 — Surah An-Najm 53:30
३०. हीच त्यांच्या ज्ञानाची सीमा आहे. तुमचा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे जाणतो, जो त्याच्या मार्गापासून विचलित झाला आहे आणि तोच चांगल्या प्रकारे जाणतो त्याला देखील, जो सन्मार्गावर आहे
Verse 31 — Surah An-Najm 53:31
३१. आणि अल्लाहचेच आहे, जे काही आकाशांमध्ये आहे आणि जे काही धरतीत आहे, यासाठी की त्याने (अल्लाहने) दुष्कर्म करणाऱ्यांना त्यांच्या कर्मांचा मोबदला द्यावा आणि सत्कर्म करणाऱ्या लोकांना चांगला मोबदला द्यावा
Verse 32 — Surah An-Najm 53:32
३२. जे लोक मोठमोठे अपराध आणि उघड निर्लज्जतेच्या कृत्यांपासून दूर राहतात, याखेरीज की काही लहान सहान अपराध त्यांच्याकडून घडतात, निःसंशय, (अशा लोकांसाठी) तुमच्या पालनकर्त्याची क्षमाशीलता अति विशाल आहे. तो तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणतो, जेव्हा त्याने तुम्हाला जमिनीतून निर्माण केले आणि जेव्हा तुम्ही आपल्या मातांच्या गर्भात मूल (अर्भक) होते तेव्हा तुम्ही आपले पावित्र्य स्वतः सांगू नका. तोच नेक - सदाचारी लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो
Verse 33 — Surah An-Najm 53:33
३३. काय तुम्ही त्याला पाहिले, ज्याने तोंड फिरवून घेतले
Verse 34 — Surah An-Najm 53:34
३४. आणि फार कमी दिले आणि हात रोखला
Verse 35 — Surah An-Najm 53:35
३५. काय त्याला परोक्ष ज्ञान आहे की तो (सर्व काही) पाहत आहे
Verse 36 — Surah An-Najm 53:36
३६. काय त्याला त्या गोष्टीची खबर नाही दिली गेली, जी मूसा (अलै.) च्या ग्रंथात होती
Verse 37 — Surah An-Najm 53:37
३७. आणि एकनिष्ठ इब्राहीम (अलै.) च्या ग्रंथात होती
Verse 38 — Surah An-Najm 53:38
३८. की कोणताही मनुष्य दुसऱ्या कोणाचेही ओझे उचलणार नाही
Verse 39 — Surah An-Najm 53:39
३९. आणि हे की प्रत्येक माणसाकरिता केवळ तेच आहे, ज्याचा त्याने स्वतः प्रयत्न केला
Verse 40 — Surah An-Najm 53:40
४०. आणि हे की निःसंशय, त्याचा प्रयत्न लवकरच पाहिला जाईल
Verse 41 — Surah An-Najm 53:41
४१. मग त्याला पुरेपूर मोबदला दिला जाईल
Verse 42 — Surah An-Najm 53:42
४२. आणि हे की तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) कडेच पोहचायचे आहे
Verse 43 — Surah An-Najm 53:43
४३. आणि हे की तोच हसवितो आणि तोच रडवितो
Verse 44 — Surah An-Najm 53:44
४४. आणि हे की तोच मारतो आणि तोच जिवंत करतो
Verse 45 — Surah An-Najm 53:45
४५. आणि हे की त्यानेच जोडा अर्थात नर - मादी निर्माण केला
Verse 46 — Surah An-Najm 53:46
४६. वीर्यापासून जेव्हा तो टपकविला जातो
Verse 47 — Surah An-Najm 53:47
४७. आणि हे की दुसऱ्यांदा जिवंत करणे त्याचीच जबाबदारी आहे
Verse 48 — Surah An-Najm 53:48
४८. आणि हे की तोच धनवान बनवितो आणि धन देतो
Verse 49 — Surah An-Najm 53:49
४९. आणि हे की तोच शेअरा (ताऱ्या) चा स्वामी व पालनकर्ता आहे
Verse 50 — Surah An-Najm 53:50
५०. आणि हे की त्यानेच पहिल्या आदला नष्ट केले आहे
Verse 51 — Surah An-Najm 53:51
५१. आणि समूदला देखील, (ज्यापैकी) एकालाही शिल्लक ठेवले नाही
Verse 52 — Surah An-Najm 53:52
५२. आणि त्याच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाला. निःसंशय, ते मोठे अत्याचारी आणि उध्दट लोक होते
Verse 53 — Surah An-Najm 53:53
५३. आणि ‘मुतफिका’ (शहर किंवा पालथ्या पडलेल्या वस्त्यांना) त्यानेच पालथे घातले
Verse 54 — Surah An-Najm 53:54
५४. मग त्यांच्यावर आच्छादित केले, जे काही आच्छादित केले
Verse 55 — Surah An-Najm 53:55
५५. तेव्हा हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या कृपा देणगी (नेमत) बद्दल वाद करशील
Verse 56 — Surah An-Najm 53:56
५६. हे (पैगंबर) खबरदार करणारे आहेत, पूर्वी होऊन गेलेल्या खबरदार करणाऱ्यांपैकी
Verse 57 — Surah An-Najm 53:57
५७. येणारी वेळ (घटिका) जवळ येऊन ठेपली आहे
Verse 58 — Surah An-Najm 53:58
५८. अल्लाहशिवाय तिला जाहीर करणारा अन्य कोणी नाही
Verse 59 — Surah An-Najm 53:59
५९. तेव्हा काय तुम्ही या गोष्टीवर आश्चर्य करता
Verse 60 — Surah An-Najm 53:60
६०. आणि हसत आहात, रडत नाही
Verse 61 — Surah An-Najm 53:61
६१. (किंबहुना) तुम्ही खेळत आहात
Verse 62 — Surah An-Najm 53:62
६२. आता अल्लाहसमोर सजदे करा (माथा टेका) आणि (त्याचीच) उपासना करा