Back to Languages

Marathi - Chapter 54 - Al-Qamar

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 1 — Surah Al-Qamar 54:1

१. कयामत जवळ आली आणि चंद्र दुभंगला

Verse 2 — Surah Al-Qamar 54:2

२. हे जेव्हा एखादा मोजिजा (चमत्कार) पाहतात, तेव्हा तोंड फिरवितात, आणि म्हणतात ही तर पहिल्यापासून चालत आलेली जादू आहे

Verse 3 — Surah Al-Qamar 54:3

३. आणि त्यांनी खोटे ठरविले व आपल्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण केले. आणि प्रत्येक कार्य निश्चित वेळेवरच निर्धारित आहे

Verse 4 — Surah Al-Qamar 54:4

४. निःसंशय, त्याच्याजवळ त्या वार्ता येऊन पोहचल्या आहेत, ज्यात तंबी - ताकीदी (ची शिकवण) आहेत

Verse 5 — Surah Al-Qamar 54:5

५. आणि पूर्ण बुद्धिकौशल्याची गोष्ट आहे, परंतु या भयभीत करणाऱ्या गोष्टींनीही काही लाभ दिला नाही

Verse 6 — Surah Al-Qamar 54:6

६. (तेव्हा, हे पैगंबर!) तुम्ही त्यांच्याकडून तोंड फिरवा, ज्या दिवशी एक पुकारणारा अप्रिय गोष्टीकडे बोलाविल

Verse 7 — Surah Al-Qamar 54:7

७. हे झुकलेल्या नेत्रांनी कबरीमधून अशा प्रकारे उठून उभे राहतील की जणू इतस्ततः पसरलेला टोळ थवा

Verse 8 — Surah Al-Qamar 54:8

८. पुकारणाऱ्याकडे धावत जात असतील आणि काफिर म्हणतील की हा दिवस तर मोठा कठीण आहे

Verse 9 — Surah Al-Qamar 54:9

९. त्यांच्यापूर्वी नूहच्या जनसमूहानेही आमच्या दासाला खोटे ठरविले होते. आणि वेडा दर्शवून झिडकारले होते

Verse 10 — Surah Al-Qamar 54:10

१०. तेव्हा त्याने आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ (प्रार्थना) केली की मी तावडीत सापडलेलो आहे. तू माझी मदत कर

Verse 11 — Surah Al-Qamar 54:11

११. तेव्हा आम्ही आकाशाचे दरवाजे मुसळधार पावसाने उघडले

Verse 12 — Surah Al-Qamar 54:12

१२. आणि जमिनीतून झरे प्रवाहित केले, तेव्हा त्या कार्यासाठी जे भाग्यात लिहिले गेले होते, (दोघेही) पाणी एकत्रित झाले

Verse 13 — Surah Al-Qamar 54:13

१३. आणि आम्ही त्याला अशा नौकेत चढविले, जी तक्ते आणि मेखा असलेली होती

Verse 14 — Surah Al-Qamar 54:14

१४. जी आमच्या डोळ्यांसमोर चालत होती. हा मोबदला त्याच्यातर्फे, ज्याचा इन्कार केला गेला होता

Verse 15 — Surah Al-Qamar 54:15

१५. आणि निःसंशय, आम्ही या घटनेला निशाणी बनवून बाकी राखले तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा

Verse 16 — Surah Al-Qamar 54:16

१६. तेव्हा (सांगा) कसा होता माझा प्रकोप आणि माझी भयपूर्ण तंबी

Verse 17 — Surah Al-Qamar 54:17

१७. आणि निःसंशय, आम्ही कुरआनाला समजण्याकरिता सोपे केले आहे१ तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा

Verse 18 — Surah Al-Qamar 54:18

१८. आदच्या जनसमूहानेही खोटे ठरविले तेव्हा कसा होता माझा अज़ाब आणि माझी भयपूर्ण तंबी

Verse 19 — Surah Al-Qamar 54:19

१९. आम्ही त्यांच्यावर सतत वेगाने वाहणारी हवा (वादळी वारा) एका सततच्या अशुभ दिवशी पाठविली

Verse 20 — Surah Al-Qamar 54:20

२०. जी लोकांना उचलून आपटत होती, जणू मुळासकट उखडलेले खजुरीचे वृक्ष आहेत

Verse 21 — Surah Al-Qamar 54:21

२१. तेव्हा कसा होता माझा प्रकोप आणि माझे भयभीत करणे

Verse 22 — Surah Al-Qamar 54:22

२२. आणि निःसंशय, आम्ही कुरआनानला बोधप्राप्तीकरिता सोपे केले आहे तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा

Verse 23 — Surah Al-Qamar 54:23

२३. समूदच्या जनसमूहाने (ही) खबरदार करणाऱ्यांना खोटे ठरविले

Verse 24 — Surah Al-Qamar 54:24

२४. आणि म्हणाले की, काय आमच्यापैकीच एका माणसाचे आम्ही अनुसरण करू लागावे? मग तर आम्ही अवश्य वाईटपणात आणि वेडेपणात पडलेले असू

Verse 25 — Surah Al-Qamar 54:25

२५. काय आम्हा सर्वांमधून फक्त त्याच्यावरच वहयी (प्रकाशना) अवतरित केली गेली? तेव्हा तो खोटारडा, घमेंडी आहे

Verse 26 — Surah Al-Qamar 54:26

२६. आता सर्व जाणून घेतील की उद्या कोण खोटारडा व घमेंडी होता

Verse 27 — Surah Al-Qamar 54:27

२७. निःसंशय, आम्ही त्यांच्या कसोटीकरिता सांडणी पाठवू तेव्हा (हे स्वालेह!) तुम्ही त्यांची प्रतीक्षा करा आणि धीर संयम राखा

Verse 28 — Surah Al-Qamar 54:28

२८. आणि त्यांना खबर द्या की पाण्याची त्याच्यात वाटणी आहे. प्रत्येक आपल्या पाळीवर हजर होईल

Verse 29 — Surah Al-Qamar 54:29

२९. तेव्हा त्यांनी आपल्या साथीदाराला बोलविले, ज्याने (सांडणीवर) हल्ला केला आणि (तिच्या) घोडनसा कापून टाकल्या

Verse 30 — Surah Al-Qamar 54:30

३०. तेव्हा कसा होता माझा अज़ाब आणि माझे भयभीत करणे

Verse 31 — Surah Al-Qamar 54:31

३१. आम्ही त्यांच्यावर एक भयंकर चित्कार पाठविला तेव्हा ते असे झाले, जणू कुंपण बनविणाऱ्याची तुडविलेली घास (चारा)

Verse 32 — Surah Al-Qamar 54:32

३२. आणि आम्ही बोधप्राप्तीकरिता कुरआनाला सोपे केले आहे तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा

Verse 33 — Surah Al-Qamar 54:33

३३. लूतच्या जनसमूहाने देखील खबरदार करणाऱ्यांना खोटे ठरविले

Verse 34 — Surah Al-Qamar 54:34

३४. निःसंशय, आम्ही त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करणारी हवा पठविली, लूत (अलै.) यांच्या कुटुंबियांखेरीज, त्यांना प्रातःकाळी आम्ही सुरक्षा (मुक्ती) प्रदान केली

Verse 35 — Surah Al-Qamar 54:35

३५. आपल्या कृपेने प्रत्येक कृतज्ञशील (दासा) ला आम्ही अशा प्रकारे मोबदला देतो

Verse 36 — Surah Al-Qamar 54:36

३६. निःसंशय, त्या (लूत) ने त्यांना आमच्या पकडीचे भय दाखविले होते, परंतु त्यांनी भय दाखविणाऱ्यांबाबत शंका धरून वाद घातला

Verse 37 — Surah Al-Qamar 54:37

३७. आणि लूत (अलै.) यांना त्यांच्या अतिथींच्या संदर्भात फूस लावू इच्छिले तेव्हा आम्ही त्यांचे डोळे आंधळे केले (आणि सांगितले), माझ्या शिक्षा - यातनेची व भयपूर्ण तंबीची गोडी चाखा

Verse 38 — Surah Al-Qamar 54:38

३८. आणि निश्चित आहे की त्यांना सकाळीच एका ठिकाणी धरणाऱ्या निर्धारित अज़ाब (ईशशिक्षे) ने नष्ट करून टाकले

Verse 39 — Surah Al-Qamar 54:39

३९. तेव्हा माझ्या प्रकोपाचा आणि माझ्या तंबीचा स्वाद चाखा

Verse 40 — Surah Al-Qamar 54:40

४०. आणि निःसंशय, आम्ही कुरआनाला बोध आणि उपदेशाकरिता सोपे केले आहे. तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा

Verse 41 — Surah Al-Qamar 54:41

४१. आणि फिरऔनच्या लोकांजवळही खबरदार करणारे आले

Verse 42 — Surah Al-Qamar 54:42

४२. त्यांनी आमच्या सर्व निशाण्यांना खोटे ठरविले तेव्हा आम्ही त्यांना मोठ्या जबरदस्त आणि शक्तिशाली पकडणाऱ्याप्रमाणे पकडले

Verse 43 — Surah Al-Qamar 54:43

४३. (हे मक्काच्या लोकांनो!) काय तुमच्या समुदायातील काफिर त्या समुदायांच्या काफिरांपेक्षा श्रेष्ठ आहेत की तुमच्यासाठी पूर्वीच्या ग्रंथांमध्ये सुटका लिहिलेली आहे

Verse 44 — Surah Al-Qamar 54:44

४४. काय हे असे म्हणतात की आम्ही वर्चस्वशाली होणारे लोक आहोत

Verse 45 — Surah Al-Qamar 54:45

४५. लवकरच हा समूह पराभूत केला जाईल आणि पाठ दाखवून पळ काढील

Verse 46 — Surah Al-Qamar 54:46

४६. किंबहुना कयामतची वेळ, त्यांच्या वायद्याची वेळ आहे आणि कयामत अतिशय कठीण आणि मोठी कटू बाब आहे

Verse 47 — Surah Al-Qamar 54:47

४७. निःसंशय, अपराधी लोक मार्गभ्रष्टतेत आणि यातनेत आहेत

Verse 48 — Surah Al-Qamar 54:48

४८. ज्या दिवशी ते तोंडघशी पाडून आगीत फरफटत नेले जातील (आणि त्यांना सांगितले जाईल) जहन्नमच्या आगीच्या स्पर्शाची गोडी चाखा

Verse 49 — Surah Al-Qamar 54:49

४९. निःसंशय, आम्ही प्रत्येक गोष्ट एका (निर्धारित) अनुमानावर निर्माण केली आहे

Verse 50 — Surah Al-Qamar 54:50

५०. आणि आमचा आदेश केवळ एकदा (चा एक शब्द) च असतो, जसे पापणीचे लवणे

Verse 51 — Surah Al-Qamar 54:51

५१. आणि आम्ही तुमच्यासारख्या कित्येकांना नष्ट करून टाकले आहे, तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा

Verse 52 — Surah Al-Qamar 54:52

५२. आणि जे जे (कर्म) त्यांनी केले आहे ते सर्व कर्मपत्रात लिहिलेले आहे

Verse 53 — Surah Al-Qamar 54:53

५३. (अशा प्रकारे) प्रत्येक लहान मोठी गोष्ट लिहिलेली आहे

Verse 54 — Surah Al-Qamar 54:54

५४. निःसंशय, अल्लाहचे भय राखणारे लोक जन्नत आणि प्रवाहांमध्ये असतील

Verse 55 — Surah Al-Qamar 54:55

५५. सचोटी व प्रतिष्ठेच्या स्थानी सामर्थ्यशाली मालका (अल्लाह) जवळ