Back to Languages

Marathi - Chapter 68 - Al-Qalam

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 1 — Surah Al-Qalam 68:1

१. नून. शपथ आहे कलम (लेखणी) ची,१ आणि त्या गोष्टीची, जी काही ते (फरिश्ते) लिहितात

Verse 2 — Surah Al-Qalam 68:2

२. तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने वेडे नाहीत

Verse 3 — Surah Al-Qalam 68:3

३. आणि निःसंशय, तुमच्यासाठी कधीही न संपणारा मोबदला आहे

Verse 4 — Surah Al-Qalam 68:4

४. आणि निःसंशय, तुम्ही फार (उत्तम) स्वभावा (चारित्र्या) वर आहात. १

Verse 5 — Surah Al-Qalam 68:5

५. तेव्हा आता तुम्हीही पाहाल आणि हे देखील पाहतील

Verse 6 — Surah Al-Qalam 68:6

६. की तुमच्यापैकी उपद्रवग्रस्त कोण आहे

Verse 7 — Surah Al-Qalam 68:7

७. निःसंशय, तुमचा पालनकर्ता आपल्या मार्गापासून भटकणाऱ्यांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि तो, मार्गदर्शन प्राप्त केलेल्यांनाही चांगल्या प्रकारे जाणतो

Verse 8 — Surah Al-Qalam 68:8

८. तेव्हा तुम्ही खोटे ठरविणाऱ्यांचे (म्हणणे) मान्य करू नका

Verse 9 — Surah Al-Qalam 68:9

९. ते तर इच्छितात की तुम्ही थोडे सुस्त पडावे तर हे देखील ढीले पडतील

Verse 10 — Surah Al-Qalam 68:10

१०. आणि तुम्ही अशा एखाद्या माणसाचेही म्हणणे मान्य करू नका, जो अधिक शपथ घेणारा तुच्छ (अपमानित) असेल

Verse 11 — Surah Al-Qalam 68:11

११. नीच (क्षुद्र), व्यंग दोष काढणारा, आणि चहाडी करणारा असेल

Verse 12 — Surah Al-Qalam 68:12

१२. भलेपणापासून रोखणारा, मर्यादेचे उल्लंघन करणारा, अपराधी असेल

Verse 13 — Surah Al-Qalam 68:13

१३. घमेंडी, मग त्याचसोबत वंशहीन असेल

Verse 14 — Surah Al-Qalam 68:14

१४. (त्याची घमेंड) केवळ यासाठी आहे की तो धनवान आणि अनेक पुत्र बाळगणारा आहे

Verse 15 — Surah Al-Qalam 68:15

१५. जेव्हा त्याच्यासमोर आमच्या आयती वाचून ऐकविल्या जातात, तेव्हा हा म्हणतो की या तर पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या कथा-कहाण्या आहेत

Verse 16 — Surah Al-Qalam 68:16

१६. आम्हीही त्याच्या सोंडे (नाका) वर डाग देऊ

Verse 17 — Surah Al-Qalam 68:17

१७. निःसंशय, आम्ही त्यांची तशीच परीक्षा घेतली जशी आम्ही बागवाल्यांची घेतली होती, तेव्हा त्यांनी शपथ घेतली की सकाळ होताच त्या (बागे) ची फळे तोडून घेऊ

Verse 18 — Surah Al-Qalam 68:18

१८. आणि इन्शा अल्लाह (जर अल्लाहने इच्छिले) म्हटले नाही

Verse 19 — Surah Al-Qalam 68:19

१९. तेव्हा त्या (बागे) वर तुमच्या पालनकर्त्यातर्फे एक आपत्ती चारी बाजूंनी फिरून गेली आणि ते झोपतच राहिले

Verse 20 — Surah Al-Qalam 68:20

२०. तर ती (बाग) अशी झाली, जणू कापणी केलेले शेत

Verse 21 — Surah Al-Qalam 68:21

२१. आता सकाळ होताच त्यांनी एकमेकांना हाक मारली

Verse 22 — Surah Al-Qalam 68:22

२२. की जर तुम्हाला फळे तोडायची आहेत तर आपल्या शेतावर सकाळीच निघा

Verse 23 — Surah Al-Qalam 68:23

२३. मग हे सर्व हळू हळू बोलत निघाले

Verse 24 — Surah Al-Qalam 68:24

२४. की आजच्या दिवशी कोणा गरिबाने तुमच्याजवळ येऊ नये

Verse 25 — Surah Al-Qalam 68:25

२५. आणि घाईघाईने सकाळीच पोहोचले (समजत होते) की आम्ही काबू मिळविला

Verse 26 — Surah Al-Qalam 68:26

२६. मग जेव्हा त्यांनी बाग पाहिली, तेव्हा म्हणू लागले की, निश्चितच आम्ही रस्ता विसरलो

Verse 27 — Surah Al-Qalam 68:27

२७. नव्हे, किंबहुना आम्ही वंचित केले गेलो

Verse 28 — Surah Al-Qalam 68:28

२८. त्या सर्वांत जो चांगला होता, तो म्हणाला की, मी तुम्हा सर्वांना सांगत नव्हतो का तुम्ही (अल्लाहची) तस्बीह (गुणगान) का नाही करीत

Verse 29 — Surah Al-Qalam 68:29

२९. (तेव्हा) सर्व म्हणू लागले की आमचा पालनकर्ता मोठा पवित्र आहे. निःसंशय, आम्हीच अत्याचारी होतो

Verse 30 — Surah Al-Qalam 68:30

३०. मग ते एकमेकांकडे तोंड करून बरे-वाईट बोलू लागले

Verse 31 — Surah Al-Qalam 68:31

३१. म्हणाले, अरेरे! निःसंशय, आम्हीच विद्रोही (अवज्ञाकारी) होतो

Verse 32 — Surah Al-Qalam 68:32

३२. काय नवल की आमचा पालनकर्ता आम्हाला यापेक्षा चांगला मोबदला प्रदान करील. निःसंशय, आम्ही आता आपल्या पालनकर्त्याशीच आशा राखतो

Verse 33 — Surah Al-Qalam 68:33

३३. अशाच प्रकारे अज़ाब येतो, आणि आखिरतचा अज़ाब फार मोठा आहे, त्यांना अक्कल असती तर (बरे झाले असते)

Verse 34 — Surah Al-Qalam 68:34

३४. निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता त्यांच्या पालनकर्त्याजवळ देणग्यांनी युक्त अशा जन्नती आहेत

Verse 35 — Surah Al-Qalam 68:35

३५. काय आम्ही ईमान राखणाऱ्यांना, अपराधी लोकांसमान ठरवू

Verse 36 — Surah Al-Qalam 68:36

३६. तुम्हाला झाले तरी काय, कसे निर्णय घेत आहात

Verse 37 — Surah Al-Qalam 68:37

३७. काय तुमच्याजवळ एखादा ग्रंथ आहे, ज्यात तुम्ही वाचता

Verse 38 — Surah Al-Qalam 68:38

३८. किंवा त्यात तुमच्या मनाला पसंत अशा गोष्टी आहेत

Verse 39 — Surah Al-Qalam 68:39

३९. किंवा आमच्याकडून तुम्ही काही अशा शपथा घेतल्या आहेत, ज्या कयामत पर्यंत बाकी राहतील, की तुमच्यासाठी ते सर्व आहे, जे तुम्ही आपल्यातर्फे निर्धारित करून घ्यावे

Verse 40 — Surah Al-Qalam 68:40

४०. त्यांना विचारा की त्यांच्यापैकी कोण या गोष्टीस जबाबदार (आणि दावेदार आहे)

Verse 41 — Surah Al-Qalam 68:41

४१. काय त्यांचे काही भागीदार आहेत? (असे असेल) तर त्यांनी आपल्या आपल्या भागीदारांना घेऊन यावे, जर ते सच्चे आहेत

Verse 42 — Surah Al-Qalam 68:42

४२. ज्या दिवशी पोटरी उघड केली जाईल, आणि सजदा करण्यासाठी त्यांना बोलाविले जाईल (परंतु ते सजदा) करू शकणार नाहीत.१

Verse 43 — Surah Al-Qalam 68:43

४३. त्यांचे डोळे (नजरा) १ झुकलेले असतील, आणि त्यांच्यावर अपमान आच्छादित होत असेल, वस्तुतः यांना सजदा करण्याकरिता (त्या वेळीही) बोलाविले जात होते, जेव्हा ते धडधाकट होते

Verse 44 — Surah Al-Qalam 68:44

४४. तेव्हा मला आणि या गोष्टीस खोटे ठरविणाऱ्यांना सोडून द्या. आम्ही त्यांना अशा प्रकारे हळू हळू खेचून घेऊ की त्यांना खबरही नसेल

Verse 45 — Surah Al-Qalam 68:45

४५. आणि मी त्यांना ढील देईन (सैल सोडेन), निःसंशय, माझी उपाययोजना मोठी मजबूत आहे

Verse 46 — Surah Al-Qalam 68:46

४६. काय तुम्ही त्यांच्याकडून एखादे पारिश्रमिक इच्छिता, ज्याच्या ओझ्याने हे दबले जात असावेत

Verse 47 — Surah Al-Qalam 68:47

४७. किंवा काय यांच्याजवळ परोक्ष ज्ञान आहे, ज्यास हे लिहीत असावेत

Verse 48 — Surah Al-Qalam 68:48

४८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाची धैर्यपूर्वक प्रतीक्षा करा आणि मासेवाल्यासारखे होऊ नका, जेव्हा त्याने दुःखाच्या अवस्थेत (आपल्या पालनकर्त्यास) पुकारले

Verse 49 — Surah Al-Qalam 68:49

४९. जर त्यास त्याच्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या कृपेने प्राप्त करून घेतले नसते, तर निःसंशय, तो वाईट अवस्थेत उघड्या जमिनीवर टाकला गेला असता

Verse 50 — Surah Al-Qalam 68:50

५०. मग त्याला त्याच्या पालनकर्त्याने निवडले आणि त्याला नेक सदाचारी लोकांमध्ये सामील केले

Verse 51 — Surah Al-Qalam 68:51

५१. आणि निकट आहे की (या) काफिरांनी आपल्या (तीक्ष्ण) नजरेने तुम्हाला घसरून टाकले.१ हे जेव्हा जेव्हा कुरआन ऐकतात आणि म्हणतात की हा तर खात्रीने वेडा आहे

Verse 52 — Surah Al-Qalam 68:52

५२. आणि वास्तविक हा (कुरआन) तर समस्त जगातील लोकांकरिता पूर्ण बोध-उपदेश आहे