Back to Languages

Marathi - Chapter 75 - Al-Qiyamah

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 1 — Surah Al-Qiyamah 75:1

१. मी शपथ घेतो कयामतच्या दिवसाची

Verse 2 — Surah Al-Qiyamah 75:2

२. आणि मी शपथ घेतो, धिःक्कार करणाऱ्या मना (आत्म्या) ची

Verse 3 — Surah Al-Qiyamah 75:3

३. काय मनुष्य असा विचार करतो की आम्ही त्याची हाडे एकत्र करणारच नाहीत

Verse 4 — Surah Al-Qiyamah 75:4

४. होय अवश्य करू, आम्हाला सामर्थ्य आहे की त्याच्या बोटांचे एक एक पेर ठीक करावे

Verse 5 — Surah Al-Qiyamah 75:5

५. परंतु मनुष्य तर इच्छितो की पुढे अवज्ञा आणि अवहेलना करीत राहावे

Verse 6 — Surah Al-Qiyamah 75:6

६. विचारतो की कयामतचा दिवस केव्हा येईल

Verse 7 — Surah Al-Qiyamah 75:7

७. तर जेव्हा डोळे जडवत होतील

Verse 8 — Surah Al-Qiyamah 75:8

८. आणि चंद्र निस्तेज होईल

Verse 9 — Surah Al-Qiyamah 75:9

९. आणि सूर्य व चंद्र एकत्र केले जातील

Verse 10 — Surah Al-Qiyamah 75:10

१०. त्या दिवशी मनुष्य म्हणेल की आज पळून जाण्यास जागा कोठे आहे

Verse 11 — Surah Al-Qiyamah 75:11

११. नाही नाही, आश्रय घेण्याचे कोणतेही ठिकाण नाही

Verse 12 — Surah Al-Qiyamah 75:12

१२. आज तर तुझ्या पालनकर्त्याकडेच (आश्रयाचे) ठिकाण आहे

Verse 13 — Surah Al-Qiyamah 75:13

१३. आज माणसाला, त्याने जे काही पुढे पाठविले आणि जे काही मागे सोडले, त्याविषयी अवगत करून दिले जाईल

Verse 14 — Surah Al-Qiyamah 75:14

१४. किंबहुना मनुष्य स्वतःच स्वतःवर प्रमाण आहे

Verse 15 — Surah Al-Qiyamah 75:15

१५. मग तो कितीही सबबी सादर करीत असला तरी

Verse 16 — Surah Al-Qiyamah 75:16

१६. (हे पैगंबर!) तुम्ही कुरआनास त्वरित तोंडी पाठ करण्यासाठी आपल्या जीभेला (घाईने) हलवू नका

Verse 17 — Surah Al-Qiyamah 75:17

१७. त्यास एकत्र करणे आणि (तुमच्या तोंडून) पठण करविणे आमची जबाबदारी आहे

Verse 18 — Surah Al-Qiyamah 75:18

१८. (यास्तव) आम्ही जेव्हा त्याचे पठण संपवू तेव्हा तुम्ही त्याच्या पठणाचे अनुसरण करा

Verse 19 — Surah Al-Qiyamah 75:19

१९. त्यास स्पष्ट करणे आमचे काम आहे

Verse 20 — Surah Al-Qiyamah 75:20

२०. नव्हे, तुम्ही तर लवकर प्राप्त होणाऱ्या (जगा) शी प्रेम राखता

Verse 21 — Surah Al-Qiyamah 75:21

२१. आणि आखिरतला सोडून बसला आहात

Verse 22 — Surah Al-Qiyamah 75:22

२२. त्या दिवशी अनेक चेहरे ताजे टवटवीत (व तेजस्वी) असतील

Verse 23 — Surah Al-Qiyamah 75:23

२३. आपल्या पालनकर्त्याकडे पाहत असतील

Verse 24 — Surah Al-Qiyamah 75:24

२४. आणि कित्येक चेहरे त्या दिवशी (कुरुप आणि) उदास असतील

Verse 25 — Surah Al-Qiyamah 75:25

२५. समजत असतील की त्यांच्याशी कंबर तोडणारा व्यवहार केला जाईल

Verse 26 — Surah Al-Qiyamah 75:26

२६. नाही नाही जेव्हा (प्राण) कंठाशी पोहचतील

Verse 27 — Surah Al-Qiyamah 75:27

२७. आणि सांगितले जाईल की कोणी झाड फुंक (तंत्र मंत्र) करणारा आहे

Verse 28 — Surah Al-Qiyamah 75:28

२८. आणि त्याने खात्री केली की ही वियोगाची वेळ आहे

Verse 29 — Surah Al-Qiyamah 75:29

२९. आणि पोटरीशी पोटरी बिलगेल

Verse 30 — Surah Al-Qiyamah 75:30

३०. आज तुझ्या पालनकर्त्याकडे जायचे आहे

Verse 31 — Surah Al-Qiyamah 75:31

३१. तेव्हा त्याने ना तर समर्थन केले, ना नमाज अदा केली

Verse 32 — Surah Al-Qiyamah 75:32

३२. उलट खोटे ठरविले आणि विमुख झाला

Verse 33 — Surah Al-Qiyamah 75:33

३३. मग आपल्या कुटुंबियांकडे तोऱ्यात गेला

Verse 34 — Surah Al-Qiyamah 75:34

३४. खेद आहे तुझ्याबद्दल! पश्चात्ताप आहे तुझ्यावर

Verse 35 — Surah Al-Qiyamah 75:35

३५. पुन्हा दुःख आहे आणि दुर्दशा आहे तुझ्यासाठी

Verse 36 — Surah Al-Qiyamah 75:36

३६. काय मनुष्य असे समजतो की त्याला व्यर्थ असे सोडून दिले जाईल

Verse 37 — Surah Al-Qiyamah 75:37

३७. काय तो एक गाढ पाण्याचा थेंब नव्हता, जो टपकविला जातो

Verse 38 — Surah Al-Qiyamah 75:38

३८. मग तो रक्ताचा गोळा बनला, मग (अल्लाहने) त्याला निर्माण केले आणि योग्यरित्या बनविले

Verse 39 — Surah Al-Qiyamah 75:39

३९. मग त्यापासून जोडी अर्थात नर-मादा बनविले

Verse 40 — Surah Al-Qiyamah 75:40

४०. काय (अल्लाह) या गोष्टी समर्थ नाही की मेलेल्यास जिवंत करावं