Back to LanguagesPrevious ChapterNext Chapter
Marathi - Chapter 80 - Abasa
Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink
Verse 1 — Surah Abasa 80:1
१. त्याने तोंड आंबट केले आणि तोंड फिरविले
Verse 2 — Surah Abasa 80:2
२. (केवळ अशासाठी) की त्याच्याजवळ एक आंधळा आला
Verse 3 — Surah Abasa 80:3
३. तुम्हाला काय माहीत, कदाचित तो सुधारला असता
Verse 4 — Surah Abasa 80:4
४. किंवा त्याने उपदेश ऐकला असता आणि त्याला उपदेश लाभदायक ठरला असता
Verse 5 — Surah Abasa 80:5
५. (परंतु) जो बेपर्वाईने वागतो
Verse 6 — Surah Abasa 80:6
६. त्याच्याकडे तर तुम्ही पुरेपूर लक्ष देत आहात
Verse 7 — Surah Abasa 80:7
७. वास्तविक त्याच्या न सुधारण्याने तुमची काहीच हानी नाही
Verse 8 — Surah Abasa 80:8
८. आणि जो मनुष्य तुमच्याजवळ धावत येतो
Verse 9 — Surah Abasa 80:9
९. आणि तो भीत (ही) आहे
Verse 10 — Surah Abasa 80:10
१०. तर त्याच्याशी तुम्ही उपेक्षावृत्ती दाखविता
Verse 11 — Surah Abasa 80:11
११. हे योग्य नाही.१ कुरआन तर बोध (दायक वस्तू) आहे
Verse 12 — Surah Abasa 80:12
१२. ज्याची इच्छा होईल (त्याने) यापासून बोध घ्यावा
Verse 13 — Surah Abasa 80:13
१३. (हा तर) आदर-सन्मान पूर्ण ग्रंथांमध्ये आहे
Verse 14 — Surah Abasa 80:14
१४. जे उच्चतम व पवित्र आणि स्वच्छ शुद्ध आहेत
Verse 15 — Surah Abasa 80:15
१५. अशा लिहिणाऱ्यांच्या हातात आहे
Verse 16 — Surah Abasa 80:16
१६. जे उच्च दर्जाचे पवित्र आहेत
Verse 17 — Surah Abasa 80:17
१७. अल्लाहची मार असो मानवावर, कसा कृतघ्न आहे
Verse 18 — Surah Abasa 80:18
१८. याला (अल्लाहने) कोणत्या वस्तूपासून निर्माण केले
Verse 19 — Surah Abasa 80:19
१९. (याला) एका वीर्यबिंदूपासून मग अनुमानावर राखले त्याला
Verse 20 — Surah Abasa 80:20
२०. मग त्याच्यासाठी मार्ग सोपा केला
Verse 21 — Surah Abasa 80:21
२१. मग त्याला मरण दिले आणि मग कबरीत गाडले
Verse 22 — Surah Abasa 80:22
२२. मग जेव्हा इच्छा होईल, त्याला जिवंत करील
Verse 23 — Surah Abasa 80:23
२३. मुळीच नाही. त्याने आतापर्यंत अल्लाहच्या आदेशाचे पालन केले नाही
Verse 24 — Surah Abasa 80:24
२४. माणसाने आपल्या भोजनावर नजर टाकली पाहिजे
Verse 25 — Surah Abasa 80:25
२५. की आम्ही भरपूर पाणी वर्षविले
Verse 26 — Surah Abasa 80:26
२६. मग जमिनीला चांगल्या प्रकारे फाडले
Verse 27 — Surah Abasa 80:27
२७. मग तिच्यातून अन्न (धान्य) उगविले
Verse 28 — Surah Abasa 80:28
२८. आणि द्राक्ष व भाजीपाला
Verse 29 — Surah Abasa 80:29
२९. आणि जैतून व खजूर
Verse 30 — Surah Abasa 80:30
३०. आणि घनदाट बागा
Verse 31 — Surah Abasa 80:31
३१. आणि मेवे व (गवत) चारा (देखील उगविला)
Verse 32 — Surah Abasa 80:32
३२. तुमच्या वापराकरिता व फायद्याकरिता आणि तुमच्या चार पायांच्या जनावरांकरिता
Verse 33 — Surah Abasa 80:33
३३. मग जेव्हा कान बधीर करून टाकणारी (कयामत) येईल
Verse 34 — Surah Abasa 80:34
३४. त्या दिवशी माणूस पळ काढील आपल्या भावापासून
Verse 35 — Surah Abasa 80:35
३५. आणि आपल्या माता व पित्यापासून
Verse 36 — Surah Abasa 80:36
३६. आणि आपल्या पत्नी व आपल्या संततीपासून
Verse 37 — Surah Abasa 80:37
३७. त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्या दिवशी अशी चिंता (लागून) राहील, जी त्याला (व्यस्त राखण्या) साठी पुरेशी असेल
Verse 38 — Surah Abasa 80:38
३८. त्या दिवशी अनेक चेहरे उज्वल असतील
Verse 39 — Surah Abasa 80:39
३९. (जे) हसत आणि आनंदित असतील
Verse 40 — Surah Abasa 80:40
४०. आणि बहुतेक चेहरे त्या दिवशी धुळीने माखलेले असतील
Verse 41 — Surah Abasa 80:41
४१. त्यांच्यावर काळिमा आच्छादित असेल
Verse 42 — Surah Abasa 80:42
४२. हे तेच इन्कारी, दुराचारी लोक असतील