Back to LanguagesPrevious ChapterNext Chapter
Marathi - Chapter 79 - An-Naziat
Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink
Verse 1 — Surah An-Naziat 79:1
१. बुडून कठोरतापूर्वक खेचणाऱ्यांची शपथ.१
Verse 2 — Surah An-Naziat 79:2
२. बंधन उकलून सोडविणाऱ्यांची शपथ
Verse 3 — Surah An-Naziat 79:3
३. आणि पोहणाऱ्या फिरणाऱ्यांची शपथ. १
Verse 4 — Surah An-Naziat 79:4
४. मग धावत पुढे जाणाऱ्यांची शपथ
Verse 5 — Surah An-Naziat 79:5
५. मग कार्याची योजना करणाऱ्यांची शपथ
Verse 6 — Surah An-Naziat 79:6
६. ज्या दिवशी थरथर कांपणारी थरथर कांपेल
Verse 7 — Surah An-Naziat 79:7
७. त्यानंतर एक मागे येणारी (मागोमाग) येईल
Verse 8 — Surah An-Naziat 79:8
८. (अनेक) हृदय त्या दिवशी धडधड करतील
Verse 9 — Surah An-Naziat 79:9
९. ज्यांच्या नजरा खाली असतील
Verse 10 — Surah An-Naziat 79:10
१०. असे म्हणतात की, काय आम्हाला पहिल्यासारख्या अवस्थेकडे पुन्हा परतविले जाईल
Verse 11 — Surah An-Naziat 79:11
११. काय अशा वेळी की जेव्हा आम्ही अगदी जीर्णशीर्ण हाडे होऊन जाऊ
Verse 12 — Surah An-Naziat 79:12
१२. म्हणतात की मग तर हे परतणे नुकसानदायक आहे. (माहीत असले पाहिजे)
Verse 13 — Surah An-Naziat 79:13
१३. की ती तर केवळ एक (भयानक) दरडावणी आहे
Verse 14 — Surah An-Naziat 79:14
१४. (जी दिली जाताच) ते एकदम मैदानात जमा होतील
Verse 15 — Surah An-Naziat 79:15
१५. काय, मूसा (अलैहिस्सलाम) चा वृत्तांत तुम्हास पोहचला आहे
Verse 16 — Surah An-Naziat 79:16
१६. जेव्हा त्यांना त्यांच्या पालनकर्त्याने तूवाच्या पवित्र मैदानात पुकारले
Verse 17 — Surah An-Naziat 79:17
१७. (की) तुम्ही फिरऔनजवळ जा, त्याने बंडखोरी (उदंडता) अंगीकारली आहे
Verse 18 — Surah An-Naziat 79:18
१८. त्याला सांगा की, काय तू स्वतःची दुरुस्ती आणि सुधारणा इच्छितो
Verse 19 — Surah An-Naziat 79:19
१९. आणि हे की मी तुला तुझ्या पालनकर्त्याचा मार्ग दाखवू यासाठी की तू (त्याचे) भय बाळगू लागावे
Verse 20 — Surah An-Naziat 79:20
२०. तेव्हा त्याला मोठी निशाणी दाखविली
Verse 21 — Surah An-Naziat 79:21
२१. तर त्याने खोटे ठरविले आणि अवज्ञा केली
Verse 22 — Surah An-Naziat 79:22
२२. मग पुन्हा परतला प्रयत्न करीत१
Verse 23 — Surah An-Naziat 79:23
२३. मग सर्वांना एकत्र करून उंच स्वरात ऐलान केले
Verse 24 — Surah An-Naziat 79:24
२४. म्हणाला, तुम्हा सर्वांचा पालनहार मीच आहे
Verse 25 — Surah An-Naziat 79:25
२५. तेव्हा (सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ) अल्लाहने देखील त्याला आखिरत (मरणोत्तर जीवना) च्या आणि या जगाच्या शिक्षा - यातनेत घेरले
Verse 26 — Surah An-Naziat 79:26
२६. निःसंशय, यात त्या माणसाकरिता बोध आहे, जो भय राखील
Verse 27 — Surah An-Naziat 79:27
२७. काय तुम्हाला निर्माण करणे अधिक कठीण आहे किंवा आकाशाला? सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्याला निर्माण केले
Verse 28 — Surah An-Naziat 79:28
२८. त्याची उंची वाढविली, मग त्याला यथायोग्य केले
Verse 29 — Surah An-Naziat 79:29
२९. आणि त्याच्या रात्रीला अंधकारपूर्ण बनविले आणि त्याच्या दिवसाला प्रकट केले
Verse 30 — Surah An-Naziat 79:30
३०. आणि त्यानंतर जमिनीला (समतल) बिछविले
Verse 31 — Surah An-Naziat 79:31
३१. त्यातून पाणी आणि चारा काढला
Verse 32 — Surah An-Naziat 79:32
३२. आणि पर्वतांना (मजबूत) रोवले
Verse 33 — Surah An-Naziat 79:33
३३. हे सर्व तुमच्या आणि तुमच्या जनावरांच्या फायद्यासाठी (आहे)
Verse 34 — Surah An-Naziat 79:34
३४. तर जेव्हा ते मोठे संकट (कयामत) येईल
Verse 35 — Surah An-Naziat 79:35
३५. ज्या दिवशी मनुष्य आपल्या केलेल्या कर्मांची आठवण करील
Verse 36 — Surah An-Naziat 79:36
३६. आणि (प्रत्येक) पाहणाऱ्याच्या समोर जहन्नम उघडपणे आणली जाईल
Verse 37 — Surah An-Naziat 79:37
३७. तेव्हा, ज्या (माणसा) ने विद्रोह अंगीकारला (असेल)
Verse 38 — Surah An-Naziat 79:38
३८. आणि ऐहिक जीवनाला प्राधान्य दिले (असेल)
Verse 39 — Surah An-Naziat 79:39
३९. (त्याचे) ठिकाण जहन्नमच आहे
Verse 40 — Surah An-Naziat 79:40
४०. तथापि, जो मनुष्य आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यापासून भीत राहिला असेल आणि आपल्या मनाला इच्छा-अभिलाषांपासून रोखले असेल
Verse 41 — Surah An-Naziat 79:41
४१. तर त्याचे ठिकाण जन्नतच आहे
Verse 42 — Surah An-Naziat 79:42
४२. लोक तुम्हाला कयामत केव्हा घडून येईल असे विचारतात
Verse 43 — Surah An-Naziat 79:43
४३. ते सांगण्याशी तुमचा काय संबंध
Verse 44 — Surah An-Naziat 79:44
४४. तिच्या ज्ञानाची अंतिम सीमा तर अल्लाहकडे आहे
Verse 45 — Surah An-Naziat 79:45
४५. तुम्ही तर फक्त तिच्याशी भयभीत राहणाऱ्यांना सावधान करणारे आहात.१
Verse 46 — Surah An-Naziat 79:46
४६. ज्या दिवशी हे तिला (प्रत्यक्ष) पाहून घेतील तेव्हा असे वाटेल की केवळ दिवसाचा अंतिम भाग अथवा आरंभीचा भागच ते (या जगात) राहिलेत