Back to Languages

Marathi - Chapter 82 - Al-Infitar

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 1 — Surah Al-Infitar 82:1

१. जेव्हा आकाश विदीर्ण होईल

Verse 2 — Surah Al-Infitar 82:2

२. आणि जेव्हा तारे झडतील (गळून पडतील)

Verse 3 — Surah Al-Infitar 82:3

३. आणि जेव्हा समुद्र वाहून जातील

Verse 4 — Surah Al-Infitar 82:4

४. आणि जेव्हा कबरींना (फाडून) उखडून टाकले जाईल

Verse 5 — Surah Al-Infitar 82:5

५. त्या वेळी प्रत्येक मनुष्य, त्याने जे काही पुढे पाठविले आणि मागे सोडले (अर्थात आपल्या पुढच्या मागच्या कर्मांना) जाणून घेईल

Verse 6 — Surah Al-Infitar 82:6

६. हे मानवा! तुला आपल्या दयाळू पालनकर्त्याबाबत कोणत्या गोष्टीने बहकविले?१

Verse 7 — Surah Al-Infitar 82:7

७. ज्या (पालनकर्त्याने) तुला निर्माण केले, मग यथायोग्य केले, मग (सुयोग्यरित्या) व्यवस्थित घडविले

Verse 8 — Surah Al-Infitar 82:8

८. ज्या रूपात इच्छिले तुला बनविले आणि तुला घडविले

Verse 9 — Surah Al-Infitar 82:9

९. मुळीच नाही, किंबहुना तुम्ही तर शिक्षा आणि मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविता

Verse 10 — Surah Al-Infitar 82:10

१०. निःसंशय, तुमच्यावर रक्षक (पहारेकरी)

Verse 11 — Surah Al-Infitar 82:11

११. सन्मानित लिहिणारे नियुक्त आहेत

Verse 12 — Surah Al-Infitar 82:12

१२. जे काही तुम्ही करता, ते जाणतात

Verse 13 — Surah Al-Infitar 82:13

१३. निःसंशय, नेक - सदाचारी लोक (जन्नतचे ऐषआराम आणि) देणग्यांनी लाभान्वित असतील

Verse 14 — Surah Al-Infitar 82:14

१४. आणि निश्चितच वाईट (दुराचारी) लोक जहन्नममध्ये असतील

Verse 15 — Surah Al-Infitar 82:15

१५. मोबदल्याच्या दिवशी तिच्यात प्रवेश करतील

Verse 16 — Surah Al-Infitar 82:16

१६. ते तिच्यातून कधीही गायब होऊ शकणार नाहीत

Verse 17 — Surah Al-Infitar 82:17

१७. आणि तुम्हाला काही माहीतही आहे की मोबदल्याचा दिवस काय आहे

Verse 18 — Surah Al-Infitar 82:18

१८. मी दुसऱ्यांदा (सांगतो की) तुम्हाला काय माहीत की मोबदल्याचा (आणि शिक्षेचा) दिवस काय आहे

Verse 19 — Surah Al-Infitar 82:19

१९. (तो असा की) ज्या दिवशी कोणी मनुष्य, कोणा माणसाकरिता कसल्याही गोष्टीचा अधिकार बाळगणारा नसेल आणि समस्त आदेश त्या दिवशी अल्लाहचेच असतील