Back to Languages

Marathi - Chapter 83 - Al-Mutaffifin

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 1 — Surah Al-Mutaffifin 83:1

१. मोठी वाईट अवस्था आहे माप-तोलमध्ये कमी करणाऱ्यांसाठी

Verse 2 — Surah Al-Mutaffifin 83:2

२. की जेव्हा लोकांकडून माप मोजून घेतात तेव्हा पुरेपूर मोजून घेतात

Verse 3 — Surah Al-Mutaffifin 83:3

३. आणि जेव्हा त्यांना माप मोजून किंवा तोल करून देतात, तेव्हा कमी देतात

Verse 4 — Surah Al-Mutaffifin 83:4

४. काय त्यांना आपल्या मृत्युनंतर जिवंत होऊन उठण्याबाबतचा विश्वास नाही

Verse 5 — Surah Al-Mutaffifin 83:5

५. त्या महान दिवसाकरिता

Verse 6 — Surah Al-Mutaffifin 83:6

६. ज्या दिवशी सर्व लोक, सर्व विश्वांच्या पालनकर्त्यासमोर उभे असतील

Verse 7 — Surah Al-Mutaffifin 83:7

७. निःसंशय, दुराचारी लोकांचा कर्म-लेख ‘सिज्जीन’ मध्ये आहे

Verse 8 — Surah Al-Mutaffifin 83:8

८. तुम्हाला काय माहीत ‘सिज्जीन’ काय आहे

Verse 9 — Surah Al-Mutaffifin 83:9

९. (हा तर) लिखित ग्रंथ आहे

Verse 10 — Surah Al-Mutaffifin 83:10

१०. त्या दिवशी खोटे उठविणाऱ्यांची मोठी दुर्दशा आहे

Verse 11 — Surah Al-Mutaffifin 83:11

११. जे मोबदला आणि शिक्षेच्या दिवसाला खोटे ठरवितात

Verse 12 — Surah Al-Mutaffifin 83:12

१२. याला फक्त तोच खोटे ठरवितो, जो मर्यादेचे उल्लंघन करणारा आणि अपराधी असतो

Verse 13 — Surah Al-Mutaffifin 83:13

१३. जेव्हा त्याच्यासमोर आमच्या आयती वाचल्या जातात तेव्हा तो म्हणतो की हे तर पूर्वीच्या लोकांचे किस्से आहेत

Verse 14 — Surah Al-Mutaffifin 83:14

१४. असे नाही, किंबहुना त्यांच्या मनावर त्यांच्या कर्मांमुळे गंज (चढलेला) आहे

Verse 15 — Surah Al-Mutaffifin 83:15

१५. एवढेच नाही. हे लोक त्या दिवशी आपल्या पालनकर्त्याच्या दर्शनापासून वंचित ठेवले जातील

Verse 16 — Surah Al-Mutaffifin 83:16

१६. मग या लोकांना निश्चितपणे जहन्नममध्ये फेकून दिले जाईल

Verse 17 — Surah Al-Mutaffifin 83:17

१७. मग त्यांना सांगितले जाईल की हेच आहे ते, ज्याला तुम्ही खोटे ठरवित राहिले

Verse 18 — Surah Al-Mutaffifin 83:18

१८. निःसंशय, सत्कर्मी लोकांचा कर्म-लेख ‘इल्लियीन’ मध्ये आहे

Verse 19 — Surah Al-Mutaffifin 83:19

१९. तुम्हाला काय माहीत की ‘इल्लियीन’ काय आहे

Verse 20 — Surah Al-Mutaffifin 83:20

२०. (तो तर) लिखित ग्रंथ आहे

Verse 21 — Surah Al-Mutaffifin 83:21

२१. अल्लाहचे निकटवर्ती (फरिश्ते) हजर असतात

Verse 22 — Surah Al-Mutaffifin 83:22

२२. निःसंशय, नेक सदाचारी लोक (मोठ्या) सुखा-समाधानात असतील

Verse 23 — Surah Al-Mutaffifin 83:23

२३. आसनांवर बसून पाहात असतील

Verse 24 — Surah Al-Mutaffifin 83:24

२४. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरूनच (अल्लाहच्या) कृपा देणग्यांची प्रफुल्लता ओळखाल

Verse 25 — Surah Al-Mutaffifin 83:25

२५. या लोकांना शुद्ध निर्भेळ मद्य पाजले जाईल

Verse 26 — Surah Al-Mutaffifin 83:26

२६. ज्यावर कस्तुरीची मोहर लागली असेल. इच्छा करणाऱ्यांनी त्याचीच इच्छा केली पाहिजे

Verse 27 — Surah Al-Mutaffifin 83:27

२७. आणि त्यात ‘तस्नीम’चे मिश्रण असेल

Verse 28 — Surah Al-Mutaffifin 83:28

२८. (अर्थात) तो झरा, ज्याचे पाणी, अल्लाहचे सान्निध्य लाभलेले लोक पितील

Verse 29 — Surah Al-Mutaffifin 83:29

२९. निःसंशय, अपराधी लोक ईमान राखणाऱ्या लोकांची थट्टा उडवित असत

Verse 30 — Surah Al-Mutaffifin 83:30

३०. आणि त्यांच्या जवळून जाताना नेत्र कटाक्ष (व इशाऱ्याने) त्याचा अपमान करीत असत

Verse 31 — Surah Al-Mutaffifin 83:31

३१. आणि जेव्हा आपल्या लोकांकडे परत येत, तेव्हा थट्टा - मस्करी करीत असत

Verse 32 — Surah Al-Mutaffifin 83:32

३२. आणि जेव्हा त्यांना पाहत, तेव्हा असे म्हणत, निश्चितच हे लोक वाट चुकलेले आहेत

Verse 33 — Surah Al-Mutaffifin 83:33

३३. यांना, त्याच्यावर निरीक्षक बनवून तर नाही पाठविले गेले

Verse 34 — Surah Al-Mutaffifin 83:34

३४. तेव्हा आज ईमान राखणारे या इन्कारी लोकांवर हसतील

Verse 35 — Surah Al-Mutaffifin 83:35

३५. आसनांवर विराजमान होऊन पाहत असतील

Verse 36 — Surah Al-Mutaffifin 83:36

३६. की आता या इन्कार करणाऱ्यांनी, जसे कर्म ते करीत होते, त्याचा पुरेपूर मोबदला प्राप्त करून घेतला