Back to Languages

Marathi - Chapter 84 - Al-Inshiqaq

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 1 — Surah Al-Inshiqaq 84:1

१. जेव्हा आकाश विदीर्ण होईल

Verse 2 — Surah Al-Inshiqaq 84:2

२. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल, आणि त्याला तसे करणे भाग आहे

Verse 3 — Surah Al-Inshiqaq 84:3

३. आणि जेव्हा जमिनीला (खेचून) पसरविले जाईल

Verse 4 — Surah Al-Inshiqaq 84:4

४. आणि तिच्यात जे आहे ते ओकून बाहेर काढील आणि अगदी खाली होईल

Verse 5 — Surah Al-Inshiqaq 84:5

५. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल आणि ती त्यास पात्र आहे

Verse 6 — Surah Al-Inshiqaq 84:6

६. हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याशी भेट होईपर्यंत हे प्रयत्न आणि सर्व कार्य आणि परिश्रम करून त्याची भेट घेणार आहेस

Verse 7 — Surah Al-Inshiqaq 84:7

७. तर त्या वेळी ज्या माणसाच्या उजव्या हातात कर्म-पत्र दिले जाईल

Verse 8 — Surah Al-Inshiqaq 84:8

८. त्याचा हिशोब मोठ्या सहजतेने घेतला जाईल.१

Verse 9 — Surah Al-Inshiqaq 84:9

९. आणि तो आपल्या कुटुंबियांकडे आनंदित होऊन परत जाईल

Verse 10 — Surah Al-Inshiqaq 84:10

१०. परंतु ज्या माणसाचे कर्म-पत्र त्याच्या पाठीमागून दिले जाईल

Verse 11 — Surah Al-Inshiqaq 84:11

११. तेव्हा तो मृत्युला बोलावू लागेल

Verse 12 — Surah Al-Inshiqaq 84:12

१२. आणि भडकत्या जहन्नममध्ये दाखल होईल

Verse 13 — Surah Al-Inshiqaq 84:13

१३. हा मनुष्य आपल्या कुटुंबात (जगात) आनंदित होता

Verse 14 — Surah Al-Inshiqaq 84:14

१४. तो समजत होता की अल्लाहकडे परतून जाणारच नाही

Verse 15 — Surah Al-Inshiqaq 84:15

१५. हे कसे शक्य आहे, वास्तविक त्याचा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे पाहात होता

Verse 16 — Surah Al-Inshiqaq 84:16

१६. मला संध्याकाळच्या लालिमेची शपथ

Verse 17 — Surah Al-Inshiqaq 84:17

१७. आणि रात्रीची आणि तिने गोळा केलेल्या वस्तूंची शपथ

Verse 18 — Surah Al-Inshiqaq 84:18

१८. आणि पूर्ण चंद्राची शपथ

Verse 19 — Surah Al-Inshiqaq 84:19

१९. निःसंशय, तुम्ही एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पोहोचाल

Verse 20 — Surah Al-Inshiqaq 84:20

२०. त्यांना झाले तरी काय की ईमान राखत नाहीत

Verse 21 — Surah Al-Inshiqaq 84:21

२१. आणि जेव्हा त्यांच्यासमोर कुरआन वाचले जाते, तेव्हा सजदा करीत नाहीत

Verse 22 — Surah Al-Inshiqaq 84:22

२२. किंबहुना त्यांनी कुप्र (इन्कार) केला, ते खोटे ठरवित आहेत

Verse 23 — Surah Al-Inshiqaq 84:23

२३. आणि हे जे काही मनात ठेवतात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो

Verse 24 — Surah Al-Inshiqaq 84:24

२४. तेव्हा तुम्ही त्यांना दुःखदायक शिक्षा यातनांची खूशखबर द्या

Verse 25 — Surah Al-Inshiqaq 84:25

२५. तथापि ईमान राखणाऱ्या नेक सदाचारी लोकांना अगणित आणि कधीही न संपणारा मोबदला प्रदान केला जाईल