Back to LanguagesPrevious ChapterNext Chapter
Marathi - Chapter 90 - Al-Balad
Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink
Verse 1 — Surah Al-Balad 90:1
१. मी या शहराची शपथ घेतो
Verse 2 — Surah Al-Balad 90:2
२. आणि तुम्ही या शहरात वास्तव्य करता
Verse 3 — Surah Al-Balad 90:3
३. आणि (शपथ आहे) मानवी पिता आणि संततीची
Verse 4 — Surah Al-Balad 90:4
४. निःसंशय, आम्ही मानवाला (मोठ्या) कष्ट-यातनेत निर्माण केले
Verse 5 — Surah Al-Balad 90:5
५. काय मनुष्य असे समजतो की तो कोणाच्या नियंत्रणाखाली नाही
Verse 6 — Surah Al-Balad 90:6
६. सांगत (फिरतो) की मी तर भरपूर धन-संपत्ती खर्च करून टाकली
Verse 7 — Surah Al-Balad 90:7
७. काय, तो (असे) समजतो की कोणी त्याला पाहिलेच नाही
Verse 8 — Surah Al-Balad 90:8
८. काय, आम्ही त्याचे दोन डोळे नाही बनविले
Verse 9 — Surah Al-Balad 90:9
९. आणि एक जीभ व दोन ओठ (नाही बनविले)
Verse 10 — Surah Al-Balad 90:10
१०. आणि त्याला दोन्ही मार्ग दाखवून दिले
Verse 11 — Surah Al-Balad 90:11
११. तेव्हा, घाटीत प्रवेश करणे त्याला शक्य झाले नाही
Verse 12 — Surah Al-Balad 90:12
१२. तुम्हाला काय माहीत की तो घाटी मार्ग काय आहे
Verse 13 — Surah Al-Balad 90:13
१३. एखाद्याची मान (दास, दासी) मुक्त करणे
Verse 14 — Surah Al-Balad 90:14
१४. किंवा भुकेल्या दिवशी पोटभर जेवु घालणे
Verse 15 — Surah Al-Balad 90:15
१५. एखाद्या नातेवाईक अनाथाला
Verse 16 — Surah Al-Balad 90:16
१६. किंवा मातीस मिळालेल्या अतिशय गरीब माणसाला
Verse 17 — Surah Al-Balad 90:17
१७. मग त्या लोकांपैकी झाला असता, जे ईमान राखतात, आणि एकमेकांना धीर संयम व दया करुणा करण्याची ताकीद करतात
Verse 18 — Surah Al-Balad 90:18
१८. हेच लोक आहेत उजव्या बाजूचे
Verse 19 — Surah Al-Balad 90:19
१९. आणि ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला, तेच लोक डाव्या हाताचे आहेत
Verse 20 — Surah Al-Balad 90:20
२०. हेच आगीच्या कोंडीत असतील जी चारी बाजूंनी घेरलेली असेल