Back to LanguagesPrevious ChapterNext Chapter
Marathi - Chapter 91 - Ash-Shams
Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink
Verse 1 — Surah Ash-Shams 91:1
१. शपथ आहे सूर्याची आणि त्याच्या उन्हाची
Verse 2 — Surah Ash-Shams 91:2
२. शपथ आहे चंद्राची जेव्हा त्याच्या मागे येईल
Verse 3 — Surah Ash-Shams 91:3
३. शपथ आहे दिवसाची जेव्हा सूर्याला प्रकट करील
Verse 4 — Surah Ash-Shams 91:4
४. शपथ आहे रात्रीची जेव्हा त्याला झाकून टाकील
Verse 5 — Surah Ash-Shams 91:5
५. शपथ आहे आकाशाची आणि त्याला बनविण्याची
Verse 6 — Surah Ash-Shams 91:6
६. शपथ आहे जमिनीची आणि तिला समतल करण्याची
Verse 7 — Surah Ash-Shams 91:7
७. शपथ आहे प्राणा (आत्म्या) ची आणि त्याला योग्य बनविण्याची
Verse 8 — Surah Ash-Shams 91:8
८. मग समज दिली त्याला दुराचाराची आणि त्यापासून अलिप्त राहण्याची
Verse 9 — Surah Ash-Shams 91:9
९. ज्याने या (आत्म्या) ला स्वच्छ शुद्ध केले, तो सफल झाला
Verse 10 — Surah Ash-Shams 91:10
१०. आणि ज्याने याला मातीत मिळवले तो असफल झाला
Verse 11 — Surah Ash-Shams 91:11
११. समूद जनसमूहाने आपल्या विद्रोहामुळे खोटे ठरविले
Verse 12 — Surah Ash-Shams 91:12
१२. जेव्हा त्यांच्यातला एक मोठा अभागी उठून उभा राहिला
Verse 13 — Surah Ash-Shams 91:13
१३. त्यांना अल्लाहच्या पैगंबराने फर्माविले होते की सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या सांडणीचे आणि तिच्या पिण्याच्या पाळीचे (रक्षण करा)
Verse 14 — Surah Ash-Shams 91:14
१४. त्या लोकांनी आपल्या पैगंबरांना खोटे जाणून त्या सांडणीला मारून टाकले. तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्या अपराधापायी त्यांना विनाशात टाकले आणि मग विनाशाला सार्वत्रिक केले आणि त्या संपूर्ण वस्तीला भुईसपाट करून टाकले
Verse 15 — Surah Ash-Shams 91:15
१५. तो या प्रकोपाच्या परिणामापासून निर्भय आहे