Back to Languages

Marathi - Chapter 92 - Al-Layl

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 1 — Surah Al-Layl 92:1

१. शपथ आहे रात्रीची जेव्हा ती पसरते

Verse 2 — Surah Al-Layl 92:2

२. आणि शपथ आहे दिवसाची जेव्हा तो प्रकाशमान होतो

Verse 3 — Surah Al-Layl 92:3

३. आणि शपथ आहे त्याची ज्याने नर व मादी निर्माण केले

Verse 4 — Surah Al-Layl 92:4

४. निःसंशय, तुमचे प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारचे आहेत

Verse 5 — Surah Al-Layl 92:5

५. तर जो (अल्लाहच्या मार्गात) देत राहिला आणि भय बाळगत राहिला

Verse 6 — Surah Al-Layl 92:6

६. आणि भलाईपूर्ण गोष्टीचे सत्य-समर्थन करीत राहिला

Verse 7 — Surah Al-Layl 92:7

७. तर आम्हीही त्याला सहज सुलभता प्रदान करू

Verse 8 — Surah Al-Layl 92:8

८. परंतु ज्याने कंजूसी केली आणि बेपर्वाई दाखविली

Verse 9 — Surah Al-Layl 92:9

९. आणि सत्कर्माच्या गोष्टींना खोटे ठरविले

Verse 10 — Surah Al-Layl 92:10

१०. तर आम्हीही त्याच्यासाठी तंगी अडचणीची सामुग्री उपलब्ध करू

Verse 11 — Surah Al-Layl 92:11

११. त्याची धन-संपत्ती त्याला (तोंडघशी) पडतेवेळी काहीच उपयोगी पडणार नाही

Verse 12 — Surah Al-Layl 92:12

१२. निःसंशय, मार्ग दाखविण्याची जबाबदारी आमची आहे

Verse 13 — Surah Al-Layl 92:13

१३. आणि आमच्याच हाती आखिरत आणि ही दुनिया आहे

Verse 14 — Surah Al-Layl 92:14

१४. मी तर तुम्हाला अंगारे(निखारे) मारणाऱ्या आगीपासून भयभीत केले आहे

Verse 15 — Surah Al-Layl 92:15

१५. जिच्यात फक्त तोच कमनशिबी दाखल होईल

Verse 16 — Surah Al-Layl 92:16

१६. ज्याने खोटे ठरविले आणि (याचे अनुसरण करण्यापासून) तोंड फिरविले

Verse 17 — Surah Al-Layl 92:17

१७. आणि या (आगी) पासून असा मनुष्य दूर ठेवला जाईल, जो अल्लाहचे मोठे भय राखून वागणारा असेल

Verse 18 — Surah Al-Layl 92:18

१८. जो स्वच्छ शुद्धता (पाकी) प्राप्त करण्यासाठी आपले धन देतो

Verse 19 — Surah Al-Layl 92:19

१९. कोणाचा त्याच्यावर काही उपकार नाही की ज्याची फेड केली जात असावी

Verse 20 — Surah Al-Layl 92:20

२०. किंबहुना, केवळ आपल्या अतिउच्च व सर्वश्रेष्ठ पालनकर्त्याची प्रसन्नता प्राप्त करण्याकरिता

Verse 21 — Surah Al-Layl 92:21

२१. निःसंशय, तो (अल्लाह देखील) लवकरच राजी होईल