Back to LanguagesPrevious ChapterNext Chapter
Marathi - Chapter 100 - Al-Adiyat
Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink
Verse 1 — Surah Al-Adiyat 100:1
१. धापा टाकीत धावणाऱ्या घोड्यांची शपथ
Verse 2 — Surah Al-Adiyat 100:2
२. मग टाप मारून चिंगाऱ्या उडविणाऱ्यांची शपथ
Verse 3 — Surah Al-Adiyat 100:3
३. मग सकाळच्या वेळी हल्ला चढविणाऱ्यांची शपथ
Verse 4 — Surah Al-Adiyat 100:4
४. तर त्या वेळी धूळ उडवितात
Verse 5 — Surah Al-Adiyat 100:5
५. मग त्याचसोबत सैन्यांमध्ये घुसतात
Verse 6 — Surah Al-Adiyat 100:6
६. निःसंशय, मनुष्य आपल्या पालनकर्त्याशी मोठा कृतघ्न आहे
Verse 7 — Surah Al-Adiyat 100:7
७. आणि खात्रीने तो स्वतःही यावर साक्षी आहे
Verse 8 — Surah Al-Adiyat 100:8
८. आणि हा धनाच्या मोहातही मोठा सक्त (कठोर) आहे
Verse 9 — Surah Al-Adiyat 100:9
९. काय याला ती वेळ माहीत नाही जेव्हा कबरीमध्ये जे (काही) आहे, काढून घेतले जाईल
Verse 10 — Surah Al-Adiyat 100:10
१०. आणि मनातल्या गुप्त गोष्टींना उघड केले जाईल
Verse 11 — Surah Al-Adiyat 100:11
११. निःसंशय, यांचा पालनकर्ता त्या दिवशी यांच्या अवस्थेची पुरेपूर खबर राखणारा असेल