Back to LanguagesPrevious ChapterNext Chapter
Marathi - Chapter 99 - Az-Zalzalah
Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink
Verse 1 — Surah Az-Zalzalah 99:1
१. जेव्हा जमिनीला पूर्णपणे थरथर हलविले जाईल
Verse 2 — Surah Az-Zalzalah 99:2
२. आणि ती आपल्यात असलेले सर्व ओझे बाहेर काढून फेकेल
Verse 3 — Surah Az-Zalzalah 99:3
३. मनुष्य म्हणू लागेल की हिला झाले तरी काय
Verse 4 — Surah Az-Zalzalah 99:4
४. त्या दिवशी जमीन आपला सर्व अहवाल सादर करील
Verse 5 — Surah Az-Zalzalah 99:5
५. यासाठी की तुमच्या पालनकर्त्याने तिला तसा आदेश दिला असेल
Verse 6 — Surah Az-Zalzalah 99:6
६. त्या दिवशी लोक वेगवेगळ्या जमाती बनून (परत) फिरतील यासाठी की त्यांना त्यांची कर्मे दाखविली जावीत
Verse 7 — Surah Az-Zalzalah 99:7
७. तेव्हा, ज्याने कणाइतकेही सत्कर्म केले असेल, तो ते पाहील
Verse 8 — Surah Az-Zalzalah 99:8
८. आणि ज्याने कणाइतकेही दुष्कर्म केले असेल, तो ते पाहील