Back to LanguagesPrevious ChapterNext Chapter
Marathi - Chapter 102 - At-Takathur
Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink
Verse 1 — Surah At-Takathur 102:1
१. जास्तीत जास्त मिळविण्याच्या मोहाने तुम्हाला गाफील करून टाकले
Verse 2 — Surah At-Takathur 102:2
२. येथेपर्यर्ंत की तुम्ही कब्रस्तानात जाऊन पोहोचले (दफन झाले)
Verse 3 — Surah At-Takathur 102:3
३. मुळीच नाही, तुम्ही लवकरच जाणून घ्याल
Verse 4 — Surah At-Takathur 102:4
४. मुळीच नाही, तुम्हाला फार लवकर कळून येईल
Verse 5 — Surah At-Takathur 102:5
५. मुळीच नाही, जर तुम्ही खात्रीशीरपणे जाणून घ्याल
Verse 6 — Surah At-Takathur 102:6
६. तर निश्चितच तुम्ही जहन्नम जरूर पाहाल
Verse 7 — Surah At-Takathur 102:7
७. आणि तुम्ही तिला विश्वासाच्या डोळ्यांनी पाहाल
Verse 8 — Surah At-Takathur 102:8
८. मग त्या दिवशी तुम्हाला निश्चितपणे कृपा देणग्यांबाबत विचारले जाईल