Back to LanguagesPrevious ChapterNext Chapter
Marathi - Chapter 97 - Al-Qadr
Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink
Verse 1 — Surah Al-Qadr 97:1
१. निःसंशय, आम्ही या (कुरआना) ला कद्र (बरकती) च्या रात्री अवतरित केले
Verse 2 — Surah Al-Qadr 97:2
२. तुम्हाला काय माहीत की कद्रची रात्र काय आहे
Verse 3 — Surah Al-Qadr 97:3
३. कद्रची रात्र एक हजार महिन्यांपेक्षा उत्तम आहे
Verse 4 — Surah Al-Qadr 97:4
४. या रात्री (प्रत्येक कार्य पार पाडण्यास) आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाने फरिश्ते आणि रुह (जिब्रील) अवतरित होतात
Verse 5 — Surah Al-Qadr 97:5
५. ही रात्र पूर्णपणे सलामतीची असते आणि प्रातःकाळाचा उदय (पहाट) होईपर्यंत असते