Back to Languages

Marathi - Chapter 104 - Al-Humazah

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 1 — Surah Al-Humazah 104:1

१. मोठी वाईट अवस्था आहे अशा त्या प्रत्येक माणसाची जो व्यंग दोष शोधणारा, चहाडी करणारा असेल

Verse 2 — Surah Al-Humazah 104:2

२. जो धन - दौलत एकत्र करतो आणि मोजून ठेवतो

Verse 3 — Surah Al-Humazah 104:3

३. तो असे समजतो की त्याची धन - दौलत त्यांच्याजवळ सदा सर्वकाळ राहील

Verse 4 — Surah Al-Humazah 104:4

४. मुळीच नाही. हा तर चुराडा करून टाकणाऱ्या आगीत फेकला जाईल

Verse 5 — Surah Al-Humazah 104:5

५. आणि तुम्हाला काय माहीत की अशी आग काय असेल

Verse 6 — Surah Al-Humazah 104:6

६. ती अल्लाहने पेटविलेली आग असेल

Verse 7 — Surah Al-Humazah 104:7

७. जी हृदयांवर चढतच जाईल

Verse 8 — Surah Al-Humazah 104:8

८. (ती आग) सगळीकडून बंदिस्त असेल

Verse 9 — Surah Al-Humazah 104:9

९. आणि त्यांच्यावर मोठमोठ्या खांबांमध्ये