Back to Languages

Marathi - Chapter 88 - Al-Ghashiyah

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 1 — Surah Al-Ghashiyah 88:1

१. काय तुम्हालाही, झाकून टाकणाऱ्या (कयामत) ची वार्ता पोहचली आहे

Verse 2 — Surah Al-Ghashiyah 88:2

२. त्या दिवशी बहुतेक चेहरे अपमानित असतील

Verse 3 — Surah Al-Ghashiyah 88:3

३. (आणि) दुःखांनी पीडित कष्ट - यातनाग्रस्त असतील

Verse 4 — Surah Al-Ghashiyah 88:4

४. ते धगधगत्या आगीत जाऊन पडतील

Verse 5 — Surah Al-Ghashiyah 88:5

५. आणि अतिशय उष्ण झऱ्याचे पाणी त्यांना पाजले जाईल

Verse 6 — Surah Al-Ghashiyah 88:6

६. त्यांच्यासाठी काटेदार झाडांखेरीज आणखी काही खायला नसेल

Verse 7 — Surah Al-Ghashiyah 88:7

७. जे ना त्यांना धष्ट पुष्ट करील, ना त्यांची भूक मिटवील

Verse 8 — Surah Al-Ghashiyah 88:8

८. बहुतेक चेहरे त्या दिवशी प्रफुल्ल टवटवीत आणि (सुसंपन्न स्थितीत) असतील

Verse 9 — Surah Al-Ghashiyah 88:9

९. आपल्या कर्मांमुळे आनंदित असतील

Verse 10 — Surah Al-Ghashiyah 88:10

१०. उच्च (प्रतीच्या) जन्नतींमध्ये असतील

Verse 11 — Surah Al-Ghashiyah 88:11

११. जिथे कोणतीही असभ्य निरर्थक गोष्ट ऐकणार नाहीत

Verse 12 — Surah Al-Ghashiyah 88:12

१२. जिथे (शीतल) झरे वाहत असतील

Verse 13 — Surah Al-Ghashiyah 88:13

१३. (आणि) त्या (जन्नतीं) मध्ये उंच उंच आसने असतील

Verse 14 — Surah Al-Ghashiyah 88:14

१४. आणि प्याले ठेवलेले (असतील)

Verse 15 — Surah Al-Ghashiyah 88:15

१५. आणि एका रांगेत लावलेले तक्के असतील

Verse 16 — Surah Al-Ghashiyah 88:16

१६. आणि मऊ मखमली गालिचे पसरलेले असतील

Verse 17 — Surah Al-Ghashiyah 88:17

१७. काय हे उंटाकडे नाही पाहत की त्यांना कशा प्रकारे निर्माण केले गेले आहे

Verse 18 — Surah Al-Ghashiyah 88:18

१८. आणि आकाशांना की कशा प्रकारे उंच केले गेले आहे

Verse 19 — Surah Al-Ghashiyah 88:19

१९. आणि पर्वतांकडे, की कशा प्रकारे गाडले गेले आहेत

Verse 20 — Surah Al-Ghashiyah 88:20

२०. आणि जमिनीकडे की कशा प्रकारे ती बिछविली गेली आहे

Verse 21 — Surah Al-Ghashiyah 88:21

२१. तर तुम्ही उपदेश करीत राहा (कारण) तुम्ही फक्त उपदेश करणारे आहात

Verse 22 — Surah Al-Ghashiyah 88:22

२२. तुम्ही काही यांच्यावर देखरेख ठेवणारे नाहीत

Verse 23 — Surah Al-Ghashiyah 88:23

२३. परंतु जो मनुष्य तोंड फिरवील आणि इन्कार करील

Verse 24 — Surah Al-Ghashiyah 88:24

२४. त्याला सर्वश्रेष्ठ अल्लाह फार मोठा अज़ाब (शिक्षा - यातना) देईल

Verse 25 — Surah Al-Ghashiyah 88:25

२५. निःसंशय, त्यांना तर आमच्याचकडे परतायचे आहे

Verse 26 — Surah Al-Ghashiyah 88:26

२६. निःसंशय, त्यांचा हिशोब घेण्याची जबाबदारी आमची आहे